27.5 C
Mumbai
Friday, July 11, 2025
घरविशेषनवा संघ, जुन्या चुका; भारताने इंग्लंडविरुद्ध सामना गमावला

नवा संघ, जुन्या चुका; भारताने इंग्लंडविरुद्ध सामना गमावला

भारत ०-१ मागे; क्षेत्ररक्षणातील चुका नडल्या

Google News Follow

Related

भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल याच्या कसोटी कर्णधारपदाच्या पदार्पणातच भारताला एक जिंकता येऊ शकणारा सामना गमवावा लागला. तब्बल ८०० हून अधिक धावा दोन डावांत करूनही आणि चार शतकं व बुमराहचा पाच बळींचा धमाका असूनही भारताला इंग्लंडकडून ५ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.

शानदार फलंदाजी, पण डगमगलेली गोलंदाजी

शुभमन गिलने इंग्लंडमधील आपले पहिले कसोटी शतक ठोकून टीकाकारांना उत्तर दिले. उपकर्णधार ऋषभ पंतने दोन्ही डावांत शतकं ठोकली, पण गोलंदाजांचे अपयश, ढिसाळ क्षेत्ररक्षण आणि तळाच्या फलंदाजानी केलेली निराशा भारताच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले.

“दुसऱ्या डावात आम्ही ४३०–४३५ च्या आसपास जाऊन डाव घोषित करू असं वाटत होतं. पण शेवटच्या सहा फलंदाजांकडून केवळ २५ धावा मिळाल्या,” असे शुभमन गिलने सांगितले. हा खूप महत्त्वाचा भाग ठरला भारताच्या पराभवातला.

इंग्लंडची दुसरी सर्वात मोठी लक्ष्यझेप – ३७१ धावांचा पाठलाग

इंग्लंडने ३७१ धावांचे लक्ष्य ४.३८ च्या सरासरीने केवळ ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. बेन् डकेटचे १४९ धावांचे झंझावाती शतक निर्णायक ठरले.

२५० पेक्षा अधिक धावाना गाठण्याची ही इंग्लंडची सहावी यशस्वी कामगिरी आहे.

भारताचा संघातील त्रुटी आणि बुमराहवर भार

भारताने पाचव्या फ्रंटलाइन गोलंदाजाची निवड न केल्यामुळे संपूर्ण भार बुमराहवर पडला.इतर गोलंदाज – सिराज, प्रसिध कृष्णा, शार्दुल ठाकूर प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले.

भारताने जवळपास आठ झेल सोडले. त्यात यशस्वी जयस्वालने तब्बल ४ झेल सोडले ते भारताला महागात पडले.

बुमराह व इतर गोलंदाजांची तुलनात्मक कामगिरी:

डाव बुमराह इतर गोलंदाज
पहिला ५/८३ (२४.४ षटके) ५/३८२ (७६ षटके)
दुसरा ०/५७ (१९ षटके) ३१६/५ (६३ षटके)

 

बुमराहला नीट खेळून काढणे आणि त्याला संधी न देणं हे आमचं लक्ष्य होतं.” असे बेन डकेटने सांगितले. तो डकेट सामन्यात सर्वोत्तम ठरला. बुमराहने पहिल्या डावात ५ बळी घेतले पण दुसऱ्या डावात त्याला निष्प्रभ करण्यात इंग्लंडला यश आले.

हे ही वाचा:

ISIS शी संबंध, संशयावरून कोलकात्यातील तिघे अटकेत!

राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प!

हे भय ट्रम्प यांना छळत राहणार!

आणीबाणीतील खलनायक कोण?

इंग्लंडच्या यशाची ही काही कारणे

जोश टंगने सामन्यात एकूण ७ बळी घेतले.

बेन स्टोक्सने नेतृत्व करताना ५ बळी घेतले.

जॉफ्रा आर्चर, मार्क वूड अनुपस्थितीतही इंग्लंडने भारताचे सर्व २० गडी बाद केले.

गंभीरवर दबाव – निवडींवर प्रश्न

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या पहिल्या ११ कसोटीत ६ पराभव भारताला पत्करावे लागले आहेत. शार्दुल ठाकूरची निवड चिंतेचा विषय ठरली. ५वा गोलंदाज न घेणे भारताला महागात पडले का? चार शतके ठोकूनही तळाच्या फलंदाजांच्या अपयशी कामगिरीमुळे भारताला हार मानावी लागली.

२ जुलैपासून दुसरी कसोटी

भारताकडे अजून या मालिकेत पुनरागमन करण्याची संधी आहे. पण त्यासाठी गंभीर पुनर्रचना, गोलंदाजीतील संतुलन, आणि खालच्या फळीतील सुधारणा गरजेची आहे.

स्कोअरबोर्ड

भारत : ४७१ आणि ३६४

इंग्लंड : ४६५ आणि ३७३/५
National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
256,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा