23.6 C
Mumbai
Saturday, February 4, 2023
घरक्राईमनामालोकल रेल्वेच्या विकलांगांच्या डब्यात गर्दुल्याचा धुडगूस

लोकल रेल्वेच्या विकलांगांच्या डब्यात गर्दुल्याचा धुडगूस

महिलांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

Google News Follow

Related

लोकलमधील विकलांगांच्या डब्यात बसून एक व्यक्ती सिगारेट ओढत खुलेआम अमली पदार्थ सेवन करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्यक्ती महिलांकडे बघून अश्लील हावभाव करत असल्याचे देखील सांगितले जात आहे.लोकलमध्ये बसून सदर व्यक्ती खुलेआम अमली पदार्थाचे सेवन करत असल्यामुळे त्या डब्यातील लोकांनी आश्चर्य व्यक्त केलेच पण अशा व्यक्तीवर कारवाई कधी होणार असा सवालही उपस्थित केला.

हे ही वाचा:

उत्तर भारतीय जनतेच्या द्वेषावर काँग्रेस फोफावली; आदित्यनाथांच्या भेटीवरून राजकारण

सामर्थ्य आहे वाटाघाटीचे!!

बावनकुळेंविषयी केलेले ट्विट आव्हाड यांनी केले डीलिट; औरंगजेबाची कबर असल्याचा केला होता दावा

पोस्टरवरच्या अंगप्रदर्शनाला आक्षेप घेणारा महिला आयोग उर्फीबाबत गप्प?

महिलांच्या डब्यातुन या व्यक्ती चा मोबाईल मध्ये व्हिडिओ करण्यात आला आहे.या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, आज सकाळी कर्जतला जाणाऱ्या लोकलच्या डब्यात हा प्रकार घडला आहे ,हा गर्दुला ठाणे रेल्वे स्थानकावरून कर्जतला जाणाऱ्या लोकलमध्ये चढला आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर उतरला, मात्र त्या दरम्यान तो लोकलमध्ये बसून तो खुलेआम सिगारेट तसेच अमली पदार्थ सेवन करत होता ,तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने दारात उभे राहून या विकलांग डब्याला लागून असलेल्या महिलांच्या डब्याकडे पाहून अश्लील हाव भाव आणि हातवारे करत गोंधळ घातला, हा सर्व व्हिडिओ लोकलमधील प्रवाशांनी चित्रित केला आहे .

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,911चाहतेआवड दर्शवा
2,003अनुयायीअनुकरण करा
61,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा