31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
घरक्राईमनामाबेकायदेशीर आयपीएल स्ट्रीमिंग ऍप प्रकरणी सायबर सेलकडून तमन्ना भाटियाला समन्स

बेकायदेशीर आयपीएल स्ट्रीमिंग ऍप प्रकरणी सायबर सेलकडून तमन्ना भाटियाला समन्स

ऍपची केली होती जाहिरात

Google News Follow

Related

अभिनेत्री तमन्ना भाटिया हिच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. तमन्ना भाटिया हिला महादेव ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंग ऍप्लिकेशनची उपकंपनी असलेल्या फेअरप्ले ऍपवर २०२३ च्या आयपीएलचे बेकायदेशीरपणे प्रसारण करून वायाकॉमला करोडोंचे नुकसान केल्याप्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. तमन्ना भाटिया हिला पुढील आठवड्याच्या २९ तारखेला महाराष्ट्र सायबर सेलमध्ये येऊन तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

याच प्रकरणी मंगळवारी बॉलीवूड अभिनेता संजय दत्त यालाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, संजय दत्त हा मंगळवारी सायबर सेलमध्ये गैरहजर राहिल्याची माहिती आहे. त्यांनी जबाब नोंदवण्यासाठी आणखी वेळ मागितला असून संजय दत्तने सायबर सेलला सांगितले की, त्याचे काही नियोजित काम आहे ज्यासाठी तो मुंबईबाहेर आहे आणि त्यामुळे तो मंगळवारी चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नाही.

महाराष्ट्र सायबर सेलने व्हायकॉमच्या तक्रारीवरून फेअरप्ले ऍपविरोधात एफआयआर नोंदवला होता. या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी भाटिया हिची चौकशी करण्यासाठी समन्स पाठवण्यात आले होते. तमन्ना भाटियाने फेअरप्लेची जाहिरात केली होती, त्यामुळेच तिला साक्षीदार म्हणून चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. फेअरप्लेची जाहिरात करण्यासाठी तिच्याशी कोणी संपर्क साधला आणि इतर माहिती जाणून घेण्यासाठी सायबर पोलिसांनी तमन्ना भाटियाला चौकशीसाठी बोलावले आहे.

हे ही वाचा:

‘डीआरडीओ’ने बनविले भारतीय सैन्यासाठी विशेष ‘बुलेट प्रूफ जॅकेट’

“नकली शिवसेनेने सोनिया गांधींच्या भीतीने प्राणप्रतिष्ठा सोहळा टाळला”

संजय राऊतांचे निकटवर्ती प्रवीण राऊतांची ७३ कोटींची मालमत्ता जप्त

भाषणादरम्यान नितीन गडकरींना आली भोवळ, स्टेजवर कोसळले!

वायाकॉमने आपल्या तक्रारीत दावा केला होता की, फेअरप्लेने टाटा आयपीएल २०२३ बेकायदेशीरपणे प्रदर्शित केले आणि यामुळे त्यांना १०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान फेअरप्लेने वेगवेगळ्या कंपन्यांच्या खात्यातून कलाकारांना पैसे दिल्याचे समोर आले आहे. संजय दत्तला याला प्ले व्हेंचर नावाच्या कंपनीच्या खात्यातून पैसे मिळाले होते, ही कंपनी कुराकाओ येथील आहे. बादशाहला लायकोस ग्रुप एफझेडएफ कंपनीच्या खात्यातून पैसे मिळाले, ही कंपनी दुबईत आहे. तर, जॅकलिन फर्नांडिसला ट्रिम जनरल ट्रेडिंग एलएलसी नावाच्या कंपनीच्या खात्यातून पैसे मिळाले, ही कंपनी दुबईत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
155,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा