29 C
Mumbai
Sunday, June 23, 2024
घरक्राईमनामासंसद परिसरात बनावट आधार कार्ड वापरून घुसखोरी करणाऱ्या तिघांना अटक

संसद परिसरात बनावट आधार कार्ड वापरून घुसखोरी करणाऱ्या तिघांना अटक

उत्तर प्रदेशातील तीन मजुरांना घेतले ताब्यात

Google News Follow

Related

संसद परिसरात बनावट आधार कार्डच्या मदतीने घुसखोरी करणाऱ्या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील तीन मजुरांनी बनावट आधार कार्ड वापरून उच्च सुरक्षा असलेल्या संसदेच्या संकुलात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी कासिम, मोनिस आणि सोयेब या तीन आरोपींना अटक केली आहे. सुरक्षा तपासणीसाठी रांगेत उभे असताना या तिघांना संसद भवनाच्या फ्लॅप गेट एंट्रीवर सीआयएसएफच्या जवानांनी रोखले आणि ताब्यात घेतले.

तीनही जण सुरक्षा तपासणीसाठी रांगेत उभे होते. यावेळी आरोपींनी त्यांचे आधार कार्ड सीआयएसएफ जवानांना सादर केले असता त्यांना कागदपत्रे संशयास्पद वाटली. ही कार्डे अधिक छाननीसाठी पाठवली असता ती बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

तपासानंतर असे लक्षात आले आहे की, या तीनही मजुरांना डी वी प्रोजेक्ट्स लिमिटेडने कामासाठी पाठवले होते. संसदेच्या संकुलात खासदारांच्या विश्रामगृहाच्या बांधकामात हे मजूर काम करत होते. या बनवट आधारकार्ड प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. तीन आरोपींना सीआयएसएफ कर्मचाऱ्यांनी दिल्ली पोलिसांच्या स्वाधीन केले आणि कलम ४६५, कलम ४१९, कलम १२० बी यासह भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सीआयएसएफने अलीकडेच सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिसांच्या तुकड्या बदलून संसदेच्या संकुलाची संपूर्ण सुरक्षा आपल्या ताब्यात घेतली आहे.

हे ही वाचा:

मै नरेंद्र दामोदरदास मोदी… ९ जून रोजी सायंकाळी तिसऱ्यांदा गुंजणार आवाज!

रोहित, हार्दिकच्या खेळीमुळे आयर्लंडवर सफाईदार विजय!

एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार

युगांडाच्या ४३ वर्षीय गोलंदाजाने पहिल्याच वर्ल्डकपमध्ये केला विश्वविक्रम

यापूर्वी २०२३ मध्ये डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशन चालू असताना दोन तरुणांनी संसेदत शिरकाव करत धुडगूस घातला होता. संसदेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी उड्या मारल्या होत्या. त्यामुळे लोकसभेत एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर घुसखोरांना अटक करण्यात आली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
162,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा