27.2 C
Mumbai
Thursday, July 23, 2026
घरक्राईमनामात्रिपुराचे डीजीपी कार्यालयात मृतावस्थेत

त्रिपुराचे डीजीपी कार्यालयात मृतावस्थेत

अनुराग धनखड यांच्या निधनाने खळबळ

Google News Follow

Related

त्रिपुराचे डीजीपी अनुराग धनखड पोलीस मुख्यालयात मृतावस्थेत सापडले आहेत. २० जुलैला अगरतळामधील पोलीस मुख्यालयातील त्यांच्या कार्यालयात ते मृतावस्थेत सापडले. पोलीस मुख्यालयात मृतावस्थेत आढळलेल्या अनुराग धनखड यांना तातडीनं अगरतळा येथील गोविंद वल्लभ पंत रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे पुढील प्रक्रिया सुरू आहे. डीजीपींच्या आकस्मिक मृत्यूनं पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

अनुराग धनखड यांनी टोकाचं पाऊल का उचललं, याबद्दल अद्याप तरी कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. अनुराग धनखड मूळचे उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्याचे रहिवासी होते. जीबी पंत रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर प्रदिप भौमिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १२ च्या सुमारास धनखड यांना रुग्णालयात आणण्यात आलं. त्यांची नाडी, रक्तदाब तपासण्यात आला. पण ते जिवंत असल्याचे कोणतेही संकेत मिळाले नाहीत. त्यांना तातडीनं इमर्जन्सी युनिटमध्ये नेण्यात आलं. सीपीआर देण्यात आला. जवळपास ४८ मिनिटं तज्ज्ञांच्या टिमनं त्यांना सीपीआर दिला. पण आमच्या प्रयत्नांना यश आलं नाही. आम्हाला त्यांचा जीव वाचवता आला नाही. दुपारी १२ वाजून ४८ मिनिटांनी त्यांना मृत घोषित करण्यात आलं. रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता.

हे ही वाचा:

राम मंदिर देणगी प्रकरणी राजकारण नको!

डेंग्यूवर ‘सुपर शिल्ड’! भारतात पहिल्या डेंग्यू लसीला मंजुरी

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत रणकंदन

संसदेकडे निघालेल्या मोर्चावर अश्रुधुराची कारवाई

पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. घटनास्थळ सील करण्यात आलं आहे. डीजीपींच्या मृत्यूमागील कारणं शोधण्यासाठी प्राथमिक तपास सुरू करण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूच्या कारणांचा उलगडा होऊ शकेल. पोलिसांनी या घटनेबद्दल अद्याप तरी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्रिपुरा सरकारनंदेखील याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

कोण होते अनुराग धनखड?

धनखड १९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांच्या मृत्यूचा तपास यंत्रणांकडून सुरू करण्यात आला आहे. अनुराग धनखड यांनी २०२५ मध्ये त्रिपुराच्या डीजीपी पदाची सुत्रं हाती घेतली होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
321,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा