28.6 C
Mumbai
Tuesday, July 21, 2026
घरदेश दुनियाखलिल अल-हय्या यांच्याकडे हमासचे नेतृत्व

खलिल अल-हय्या यांच्याकडे हमासचे नेतृत्व

याह्या सिनवार यांच्या मृत्यूनंतर जवळपास दोन वर्षांनी हा निर्णय

Google News Follow

Related

इस्रायल-हमास युद्ध सुरू असतानाच हमासने आपल्या नेतृत्वात मोठा बदल करत खलिल अल-हय्या यांची संघटनेच्या नव्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. याह्या सिनवार यांच्या मृत्यूनंतर जवळपास दोन वर्षांनी हा निर्णय घेण्यात आला असून, हमासने सोमवारी अधिकृत निवेदनाद्वारे याची घोषणा केली.

याह्या सिनवार हे ऑक्टोबर २०२४ मध्ये गाझामधील लढाईदरम्यान इस्रायली सैन्याच्या कारवाईत ठार झाले होते. त्यानंतर हमासचे नेतृत्व पाच सदस्यीय अंतरिम नेतृत्व परिषदेकडे होते. आता खलिल अल-हय्या यांच्याकडे संघटनेची सूत्रे अधिकृतपणे सोपवण्यात आली आहेत.

खलिल अल-हय्या हे हमासच्या सर्वात प्रभावी नेत्यांपैकी एक मानले जातात. ते संघटनेचे प्रमुख राजकीय वाटाघाटीकार असून, गाझा युद्धादरम्यान इस्रायलसोबतच्या अप्रत्यक्ष युद्धविराम आणि ओलीस सुटका चर्चांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. इस्माईल हनियेह आणि याह्या सिनवार यांच्या मृत्यूनंतर संघटनेतील त्यांचे महत्त्व आणखी वाढले होते.

अल-हय्या यांचा जन्म गाझा पट्टीत झाला असून, ते १९८७ मध्ये हमासची स्थापना झाल्यापासून संघटनेशी संबंधित आहेत. त्यांनी पूर्वी पॅलेस्टिनी विधान परिषदेतही सदस्य म्हणून काम केले आहे. गेल्या काही वर्षांपासून ते कतारमध्ये वास्तव्यास असून, अरब आणि इस्लामिक देशांशी हमासचे संबंध दृढ करण्याची जबाबदारी ते सांभाळत होते.

इस्रायलने यापूर्वी अनेकदा अल-हय्या यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. २००७ मधील एका हवाई हल्ल्यात त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचा मृत्यू झाला होता. २०१४ च्या गाझा युद्धात त्यांचा मुलगा, सून आणि नातवंडेही इस्रायली हल्ल्यात मारली गेली. २०२५ मध्ये कतारमधील दोहा येथे झालेल्या हल्ल्यातूनही ते बचावले होते.

हे ही वाचा:

राम मंदिर देणगी प्रकरणी राजकारण नको!

डेंग्यूवर ‘सुपर शिल्ड’! भारतात पहिल्या डेंग्यू लसीला मंजुरी

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत रणकंदन

संसदेकडे निघालेल्या मोर्चावर अश्रुधुराची कारवाई

हमासच्या निवेदनानुसार, अल-हय्या यांची निवड अंतर्गत निवडणूक प्रक्रियेद्वारे करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीनंतर विद्यमान पाच सदस्यीय नेतृत्व परिषद बरखास्त केली जाणार असून, नव्या नेतृत्वाची पुनर्रचना करण्यात येणार आहे. संघटनेच्या शूरा परिषदेने ही निवड अत्यंत गोपनीय पद्धतीने केली असल्याचे सांगण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते, गाझामधील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर खलिल अल-हय्या यांच्या नेतृत्वाखाली हमासची पुढील रणनीती, युद्धविराम चर्चांचा वेग आणि इस्रायलसोबतच्या संघर्षाची दिशा यावर जगभराचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
321,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा