31.4 C
Mumbai
Thursday, October 8, 2026
घरक्राईमनामादोन सख्ख्या भावांना सामूहिक बलात्काराच्या गुन्हयात अटक

दोन सख्ख्या भावांना सामूहिक बलात्काराच्या गुन्हयात अटक

Google News Follow

Related

धारावीत एका २० वर्षीय विवाहितेवर झालेल्या बलात्काराच्या गुन्हयात दोन सख्ख्या भावांना अटक करण्यात आली आहे. १०२ सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या दोघांची ओळख पटवून विलेपार्ले येथून अटक केली असून दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसानी सांगितले.

अनिल चौहान (१९) आणि त्याचा सख्खा भाऊ निलेश चौहान (२०) असे या भावांची नावे आहेत. हे दोघे विलेपार्ले पश्चिम या ठिकाणी आई वडिलांसह राहण्यास असून या पूर्वी हे कुटुंब धारावीत राहण्यास होते.

१० मे रोजी दिवसाढवळ्या धारावी सारख्या दाट वस्तीत झालेल्या सामूहिक बलात्काराने संपूर्ण धारावी हादरली होती. एकट्या दुकट्या घरात राहणाऱ्या महिलांमध्ये या घटनेनंतर भीतीचे वातावरण पसरले होते. उत्तर प्रदेशातील २० वर्षांची पीडित महिला ही २ महिन्यापूर्वीच लग्न करून सासरी आली होती. दुपारच्या सुमारास पीडित ही घरी एकटी असताना दोघे जण आले व त्यांनी तीला चाकुचा धाक दाखवून एक जण तिच्यावर बलात्कार करीत होता तर दुसरा अत्याचाराचा प्रसंग मोबाईल फोनच्या कॅमेरामधून व्हिडीओ बनवत होता. त्यानंतर या दोघांनी तिला बाहेर यायची वाच्यता केल्यास जीवे मारू अशी धमकी देऊन निघून गेले.

हे ही वाचा:

गुंतवणूकदारांना एलआयसीने केले निराश

माथेरानमध्ये आता धावणार ई- रिक्षा

‘या’ दिवशी अयोध्येतील राम मंदिर होणार भाविकांसाठी खुलं

चिदंबरम यांच्या घरात पोहोचली सीबीआय

 

धारावी पोलिसानी गुन्हा दाखल करून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली, सुमारे १२५ कॅमेरे तपासल्या नंतर एका फुटेज मध्ये पीडितेने सांगितलेल्या वर्णनाचे आरोपी दिसून आले. तपास अधिकारी यांनी फुटेज वरून आरोपीचा शोध घेऊन दोघांना विलेपार्ले येथून अटक करण्यात आली आहे. या दोघांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोघांना २३मे पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा