32 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरक्राईमनामाठाण्यातील 'छम छम' मुळे दोन पोलिसांचे निलंबन, तर दोघांची बदली

ठाण्यातील ‘छम छम’ मुळे दोन पोलिसांचे निलंबन, तर दोघांची बदली

Google News Follow

Related

ठाण्यात डान्स बार सुरू असल्याच्या गौप्यस्फोटाने सारा महाराष्ट्र हादरून गेला तिकडे को बीड नियमावलीचे कारण पुढे करत सर्व दैनंदिन व्यवहार चार वाजल्यानंतर बंद असताना डान्सबारची छम छम मात्र सर्रास सुरू आहे ती गोष्ट बाहेर आल्यानंतर ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे तर दोघांची बदली करण्यात आली आहे.

एबीपी माझा या मराठी वृत्त वाहिनीने डान्स बार संबंधीचे स्टिंग ऑपरेशन प्रसिद्ध केले आणि महाराष्ट्रात खळबळ उडाली. ठाण्यातले डान्स बार हे कोविड प्रतिबंधक नियमावली धाब्यावर बसवून राजरोसपणे सुरू असल्याचे या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले. त्यामुळे ठाकरे सरकारमधील गृह खात्यातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला.

हे ही वाचा:
घराघरात कंबरभर पाणी आणि बुडाले संसार

असहिष्णुतेच्या फुग्याला ‘प्यू रिसर्च’ ची टाचणी

दिल्लीवर ड्रोन अटॅकचे संकट

मुंबईकरांच्या जीवाशी खेळलात, आता पाण्याशी खेळ नको!

महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेता येत असल्याचे नमूद केले. त्याप्रमाणे ठाण्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले आहेत. नौपाडा पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि वर्तक नगर पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांना निलंबित केले आहे. तर नौपाड्याच्या पोलिस उपायुक्त नीता पाडवी आणि वर्तक नगरचे पोलिस उपयुक्त पंकज शिरसाट यांची कंट्रोल रूम अर्थात नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

ठाण्याचे पोलिस आयुक्त जगजीत सिंह यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिल्याची माहिती समोर येत आहे. पोलिस उपायुक्तांच्या देखरेखीखाली ही चौकशी होणार असल्याचे समजते. तर या प्रकरणात दोषी आढळलेल्या बारवरही कारवाई करण्यात येणार आहे. त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले जाणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा