26 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरक्राईमनामाचहा पिताना रागाने पाहिले म्हणून केली हत्या; दोघांना केली अटक

चहा पिताना रागाने पाहिले म्हणून केली हत्या; दोघांना केली अटक

Related

कोणत्या कारणावरून कुणी एखाद्याची हत्या करेल हे सांगता येणार नाही. कांजूरमार्ग येथे अशीच एक आश्चर्यकारक घटना घडली. चहा पितांना रागाने बघितले म्हणून एकाची हत्या करण्यात आल्याची घटना कांजूरमार्ग पश्चिमेत घडली. प्रकरणी पार्कसाईड पोलिसांनी दोन जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.

निखिल झोरे असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. निखिल हा कांजूरमार्ग पश्चिमेतील एमएमआरडीए वसाहत इमारत क्रमांक ४ येथे राहण्यास होता. फूड डिलिव्हरी कंपनीत काम करणारा निखिल हा रविवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास मित्रांसोबत चहा पिण्यासाठी हुमा सिनेमागृह येथे आला होता. त्याच ठिकाणी भांडुप आणि पंतनगर येथे राहणारे निखिल जाधव आणी नितेश अनुबुळे हे दोघे चहा घेत असताना निखिल याने या दोघांकडे रागाने बघितले. या कारणा वरून शाब्दिक वाद होऊन दोघे अनुबुले आणि जाधव हे दोघे निघून गेले व काही वेळातच हे दोघे परत तिकडे आले व त्यांनी सोबत आणलेल्या हत्याराने निखिल झोरे याच्यावर हल्ला करून पळून गेले.

हे ही वाचा:

“मविआ सरकार अल्पमतात; उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा”

झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू भाजपाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार

विरोधी पक्षातर्फे राष्ट्रपतीपदासाठी यशवंत सिन्हा

‘धर्मवीर’चे संकेत मुख्यमंत्र्यांना कळलेच नाहीत!

 

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला निखिल याला राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.याप्रकरणी पार्कसाईड पोलिसांनी दोघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा संलग्न तपास गुन्हे शाखा कक्ष ७ चे पथक करीत होते, तांत्रिक तपासावरून कक्ष ७ ने भांडुप येथून निखिल जाधव आणि घाटकोपर पंतनगर येथून नितेश अनुबुळे या दोघांना अटक केली. या दोघांना पुढील तपासासाठी पार्कसाईड पोलिसंच्या ताब्यात देण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,919चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
14,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा