उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात पुन्हा एकदा एक घृणास्पद व्हिडिओ समोर आला आहे. एका लग्न समारंभात एक मुस्लीम तरुण रोटी बनवताना त्यावर थुंकताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केला आणि त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे.
मुंडली पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी असलेल्या २२ वर्षीय इम्रानला रोटी थुंकून बनवल्याबद्दल पोलिसांनी अटक केली. इम्रान तंदूरमध्ये रोटी बनवण्याचे काम करतो. २१ फेब्रुवारी रोजी, थाना ब्रह्मपुरी भागातील प्रेम मंडपात एका हिंदू लग्न समारंभात, इम्रान तंदूरवर रोटी बनवत होता आणि या दरम्यान, तो तंदूरमध्ये ठेवण्यापूर्वी त्यावर थुंकत होता. लग्नाला आलेल्या एका व्यक्तीने इम्रानचे हे कृत्य मोबाईलमध्ये कैद केले आणि ते व्हायरल केले.
हे ही वाचा :
काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा!
बांगलादेश म्हणतो, अमेरिकेचे ३ कोटी डॉलर आम्हाला मिळालेलेच नाहीत!
‘आप’च्या दिल्ली दारू धोरणामुळे २,००२ कोटी रुपयांचा महसूल तोटा!
महाकुंभ: महाशिवरात्रीला शेवटच्या अमृतस्नानाला १ कोटीहून अधिक भाविक उपस्थित राहण्याची शक्यता!
वधूच्या कुटुंबीयांनी आचाऱ्याला इम्रानच्या या कृत्याबद्दल सांगितले आणि व्हिडिओही दाखवला. हा व्हिडिओ व्हायरल होताच काही लोक लग्न समारंभात पोहोचले आणि त्यांनी आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी तंदूर कारागीर इम्रानविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. एसपी सिटी आयुष विक्रम सिंह म्हणाले की, इम्रानला अटक करण्यात आली आहे आणि त्याला न्यायालयात हजर करण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान, मेरठमध्ये तंदुरी रोटीवर थुंकण्याची ही पहिलीच घटना नाही, याआधीही या कृत्यामुळे अनेक आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आले आहे.