१९८४ च्या दिल्लीतील शीखविरोधी दंगलींमध्ये दोन शीखांच्या हत्येप्रकरणी माजी काँग्रेस खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्ली कॅन्टोन्मेंट दंगली प्रकरणात सहभागी असल्याबद्दल सज्जन कुमार यांना ही दुसरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
राऊस अव्हेन्यू कोर्टाने दिलेल्या निकालात १ नोव्हेंबर १९८४ रोजी दिल्लीतील सरस्वती विहार परिसरात जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग यांना मारण्यासाठी जमावाचे नेतृत्व करण्यासाठी आणि त्यांना चिथावणी दिल्याबद्दल सज्जन कुमार यांना जबाबदार धरले. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, सरकारी वकिलांनी सांगितले की, सज्जन कुमार यांच्या नेतृत्वाखाली आणि शस्त्रांनी सज्ज असलेल्या जमावाने मोठ्या प्रमाणात लूटमार, जाळपोळ आणि शिखांच्या मालमत्तेची नासधूस केली.
सरकारी वकिलांनी यापूर्वी सज्जन कुमारला मृत्युदंडाची मागणी केली होती. त्यांच्या लेखी सादरीकरणात, सरकारी वकिलांनी असा युक्तिवाद केला की हा खटला निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणापेक्षाही गंभीर आहे, कारण त्यात संपूर्ण समुदायाला जाणूनबुजून लक्ष्य करण्यात आले होते.
हे ही वाचा :
बांगलादेश म्हणतो, अमेरिकेचे ३ कोटी डॉलर आम्हाला मिळालेलेच नाहीत!
‘आप’च्या दिल्ली दारू धोरणामुळे २,००२ कोटी रुपयांचा महसूल तोटा!
महाकुंभ: महाशिवरात्रीला शेवटच्या अमृतस्नानाला १ कोटीहून अधिक भाविक उपस्थित राहण्याची शक्यता!
‘संभाजी महाराजांचा छळ ४० दिवस दाखवला असता तर विपरीत परिणाम झाला असता’
दरम्यान, न्यायालयाने आपला निकाल देत काँग्रेसच्या माजी खासदाराला जन्म ठेपेची शिक्षा सुनावली. परंतु, न्यायालयाच्या या निकालावर समाधानी नसल्याचे शीख नेते गुरलाद सिंग म्हटले. या प्रकरणी उच्च न्यायालयात जाऊन सज्जन कुमारला मृत्युदंडाची शिक्षा जाहीर करण्याची विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या या दिग्गज नेत्याला यापूर्वी उत्तेजित करणे, शीखांविरुद्ध भडकाऊ भाषण करणे आणि जातीय सलोखा बिघडवणे यासारख्या अनेक प्रकरणांमध्ये दोषी ठरविण्यात आले आहे.