जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्याचे समारोप होत असताना, महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी २०२५ च्या महाकुंभमेळ्याच्या अंतिम अमृत स्नानाला १ कोटीहून अधिक भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. महाकुंभाच्या शेवटच्या दिवशी होणाऱ्या यात्रेकरूंच्या मोठ्या संख्येने गर्दी लक्षात घेता उत्तर प्रदेश सरकारने कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे.
१३ जानेवारी रोजी महाकुंभ सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे ६४ कोटी भाविकांनी गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर असलेल्या त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले आहे. आजपर्यंत एकूण पाच अमृत स्नान झाले आहेत, १३, १४, २९ जानेवारी, ३ आणि १२ फेब्रुवारी. आता उद्याच्या महाशिवरात्रीच्या अमृत स्नानानंतर महाकुंभचा शेवट होणार आहे.
महाकुंभाचा उद्या शेवट होणार असल्याचे देशाच्या कानाकोपऱ्यातील भाविक मिळेल त्या गाडीने प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. सकाळ पासून मोठी गर्दी घाटांवर दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासठी प्रशासन नजर ठेवून आहे.
हे ही वाचा :
‘संभाजी महाराजांचा छळ ४० दिवस दाखवला असता तर विपरीत परिणाम झाला असता’
राजस्थान: अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी आरोपीच्या घरावर चालवला बुलडोजर!
नोकरी-जमीन घोटाळा प्रकरणी लालू यादव कुटुंबाला धक्का, न्यायालयाने बजावले समन्स!
सभागृहातील गदारोळानंतर आतिशी यांच्यासह १२ आप आमदार निलंबित
दरम्यान, प्रयागराजकडे जाणाऱ्या सर्व प्रमुख महामार्गांवर आणि मार्गांवर मोटारसायकलवरून पोलिसांच्या ४० पथके तैनात करण्यात आली आहेत. सुरळीत आणि सुरक्षित वाहतूकीसाठी, वळवण्याचे मार्ग तयार करण्यात आले आहेत. प्रयागराजला जोडणाऱ्या सात रस्ते मार्गांवर अतिरिक्त महासंचालक आणि महानिरीक्षक स्तरावरील अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. कुंभमेळ्याचा शेवटचा दिवस आणि महाशिवरात्रीशी असल्याने, शहरातील सर्व शिवमंदिरांमध्ये भाविकांना दर्शन घेण्याची परवानगी दिली गेली आहे.
महाकुंभाच्या सुरुवातीला, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अंदाज व्यक्त केला होता की या सोहळ्याला ४५ कोटींहून अधिक भाविक येतील. मात्र, हा महत्त्वाचा टप्पा ११ फेब्रुवारीपर्यंत गाठण्यात आला. पुढील तीन दिवसांत ही संख्या ५० कोटींपेक्षा जास्त झाली आणि आज ती ६४ कोटींवर पोहोचली आहे. उद्याच्या शेवटच्या दिवशी ही संख्या ६५ कोटींच्यावर जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.