34 C
Mumbai
Saturday, March 15, 2025
घरविशेषराजस्थान: अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी आरोपीच्या घरावर चालवला बुलडोजर!

राजस्थान: अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी आरोपीच्या घरावर चालवला बुलडोजर!

पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरु 

Google News Follow

Related

राजस्थानच्या बेवार जिल्ह्यातून अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि धर्मांतराचे नुकतेच प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी विजयनगर नगरपालिकेने मोठी कारवाई करत अत्याचार प्रकरणात सहभागी असलेल्या एका आरोपीच्या घरावर बुलडोजर चालवला आहे. विजयनगर नगरपालिकेने आरोपीने केलेले बेकादेशीर अतिक्रमण हटवले आहे. राजस्थान पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात आतापर्यंत ८ जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी तीन अल्पवयीन असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणात एका माजी नगरसेवकालाही अटक करण्यात आल्याचे पोलसांनी सांगितले. आरोपींची सध्या चौकशी सुरु आहे. विजयनगर नगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी प्रताप सिंह यांनी सांगितले की, ५ आरोपींना बेकायदेशीर कब्जाबाबत कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. यानंतर सोमवारी (२४ फेब्रुवारी) महापालिकेच्या पथकाने बुलडोजर वापरून आरोपी अरमानचे घर पाडले. पथकाने सरकारी जमिनीवरील बेकादेशीर बांधकामे हटवली आणि बेकादेशीर बांधकामासह परिसर सील केला.

हे ही वाचा : 

उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरून एआयएडीएमके आमदाराच्या घरावर छापेमारी

पंजाबमध्ये चालला बुलडोझर; ड्रग्ज माफियाचे बेकायदेशीर बांधकाम केले जमीनदोस्त

अमेरिकेकडून झालेल्या हद्दपारीच्या कारवाईनंतर पंजाबमधील ४० ट्रॅव्हल एजंट्सचे परवाने रद्द

ट्रम्प यांची पुतीन यांना साथ; संयुक्त राष्ट्रात युक्रेनविरोधात मतदान

दरम्यान, अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ सोमवारी बेवार, बिजैनगर, मसुदा, सरदार आणि आसपासच्या भागात बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत विविध संघटनांनी मोर्चे काढले.

पोलीस अधीक्षक सज्जन सिंह यांनी सांगितले कि, या प्रकरणात माजी नगरसेवक हकीम कुरेशीला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरु आहे. रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी चौकशी आणि कारवाई सुरु आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
235,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा