एआयएडीएमकेचे आमदार अम्मन के अर्जुनन यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. तामिळनाडूच्या दक्षता आणि भ्रष्टाचार विरोधी संचालनालयाच्या (DVAC) अधिकाऱ्यांनी मंगळवार, २५ फेब्रुवारी रोजी कोइम्बतूरजवळील सेल्वापुरम येथील एआयएडीएमके आमदार अम्मन के अर्जुनन यांच्या निवासस्थानी छापा टाकला आहे. त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता जमवल्याचा आरोप करण्यात आला असून याचं पार्श्वभूमीवर हे छापे टाकण्यात आले आहेत.
कोइम्बतूर उत्तरचे आमदार अम्मन के अर्जुनन आणि त्यांच्या पत्नी विजयालक्ष्मी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मे २०२२ मध्ये दाखल झालेल्या तक्रारीवरून ही चौकशी सुरू झाली असून छापेमारी दरम्यान अधिकाऱ्यांनी निवासस्थानावरून अनेक कागदपत्रे जप्त केली आहेत. या कागदपत्रांची अधिक तपासणी केल्यावर, अर्जुनन यांनी त्याच्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा कितीतरी पटीने जास्त मालमत्ता जमा केल्याचे उघड झाले आहे.
#WATCH | Tamil Nadu: DVAC team conducted a raid at AIADMK MLA and Coimbatore District Amman K. Arjunan's residence over a disproportionate assets case. pic.twitter.com/gKrTNO6BpE
— ANI (@ANI) February 25, 2025
मूळचे मदुराई जिल्ह्यातील आणि मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून आलेले अम्मन के अर्जुनन २०१६ मध्ये पहिल्यांदा कोइम्बतूर दक्षिण मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी त्यांच्या घोषित मालमत्तेचे मूल्य २.३ कोटी रुपये होते. पुढे, २०२२ पर्यंत त्यांची मालमत्ता ५.९६ कोटी रुपये झाली, जी त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा ७१.१९ टक्के वाढ होती. चौकशीत असे दिसून आले की त्यांनी आमदार असताना अतिरिक्त २.७५ कोटींची मालमत्ता जमा केली होती. या मालमत्ता त्यांच्या, पत्नी विजयालक्ष्मी आणि त्यांच्या मुला- मुलीच्या नावावर नोंदणीकृत होत्या.
हे ही वाचा :
पंजाबमध्ये चालला बुलडोझर; ड्रग्ज माफियाचे बेकायदेशीर बांधकाम केले जमीनदोस्त
अमेरिकेकडून झालेल्या हद्दपारीच्या कारवाईनंतर पंजाबमधील ४० ट्रॅव्हल एजंट्सचे परवाने रद्द
ट्रम्प यांची पुतीन यांना साथ; संयुक्त राष्ट्रात युक्रेनविरोधात मतदान
११ मोबाईल, ९०० सिमकार्डचा वापर, उन्नावमध्ये ५ संशयित बांगलादेशींना अटक!
चालू असलेल्या छाप्यादरम्यान आणखी कागदपत्रे जप्त केली जाऊ शकतात, अशी शक्यता आहे. माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ७ वाजता डीव्हीएसीने छापा टाकण्यास सुरुवात केली आणि पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, अण्णाद्रमुकने आमदारावरील छाप्याचा तीव्र निषेध केला आहे आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक सरकारने हे राजकीयदृष्ट्या प्रेरित कृत्य केल्याचे म्हटले आहे. सत्ताधारी द्रमुक भ्रष्टाचारविरोधी छाप्यांचा वापर विरोधी नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी एक साधन म्हणून करत असल्याचा आरोप पक्षाने केला आहे, तर स्वतःच्या गटातील भ्रष्टाचाराकडे डोळेझाक करत आहे.