उत्तर प्रदेशातील उन्नावमधून ५ संशयित बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. यांच्याकडून सौदी अरेबियाचे चलन, भारतीय पासपोर्ट आणि इतर संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, इंटेलिजेंस ब्युरो (IB) आणि दहशतवाद विरोधी पथक (ATS) देखील तपासात सामील झाले आहेत.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपींपैकी मुख्य आरोपी अब्दुल जलील याच्याकडे मथुरा येथे बनवलेला भारतीय पासपोर्ट आढळला. याशिवाय त्याच्याकडे दिल्लीचे आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र देखील आहे. चौकशीत अब्दुल जलीलने दिल्ली विधानसभा निवडणुकीतही मतदान केल्याचे समोर आले.
पोलिसांनी अशीही माहिती दिली आहे की आरोपींचे बांगलादेशातील एका इस्लामिक बँकेत खाते आहे. याशिवाय त्यांच्याकडून सौदी रियाल (सौदी चलन) देखील जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे ते एखाद्या मोठ्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कशी जोडले असण्याची शंका व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा :
बोगस कागदपत्रांसह बँकेकडून कर्ज घेऊन वाहनांची परस्पर विक्री करणारी टोळी जेरबंद
‘सकाळच्या भोंग्याला सुसंवाद शिकवा तरच राज्यातील संवादाची परिस्थिती सुधारेल!’
कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा, कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती!
नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनात राजकीय वक्तव्य करण्याची गरज नव्हती
त्यांच्याकडून ११ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, यातील एका मोबाईलमध्ये ९०० हून अधिक सिमकार्ड वापरले गेल्याचे समोर आले आहे. शिवाय, आरोपी संपर्कासाठी व्हाट्सअॅप ऐवजी बांगलादेशात लोकप्रिय असलेल्या आयएमओ अॅपचा वापर करत होते. दरम्यान, अटक करण्यात आलेल्यांच्या चौकशीत आणि कागदपत्रे पाहता. ते सर्व बांगलादेशी नागरिक असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी उन्नाव पोलिसांकडून तपास सुरु आहे. याबाबत पुढील माहिती लवकरच समोर येईल.