पंजाबमध्ये अंमली पदार्थांच्या विरोधात मोहीम हाती घेतली असून राज्यभर या विरोधात कारवाई सुरू आहे. याचं पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री उशिरा लुधियानाच्या तलवंडी गावात ड्रग्ज माफियांच्या बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर चालवण्यात आला. ड्रग्ज माफिया सोनू याचे बेकायदेशीर बांधकाम हटवण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून ड्रग्ज तस्करीत सहभागी असलेल्या माफिया सोनू विरोधात सहा गुन्हे दाखल आहेत.
एएनआयने या कारवाईची माहिती दिली असून पंजाब पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा तलवंडी गावातील ड्रग्ज माफिया सोनू याचे बेकायदेशीर बांधकाम बुलडोझरने पाडले. सोनू गेल्या तीन वर्षांपासून ड्रग्ज तस्करीत सहभागी आहे. शिवाय त्याच्याविरुद्ध सहा एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
#WATCH | Punjab police demolished the illegal construction of a drug mafia, Sonu of Talwandi village late last night by a bulldozer. Sonu has been involved in drug smuggling for 3 years, and 6 FIRs were registered against him.
(Source: Punjab Police) pic.twitter.com/NoHOQNUj5Q
— ANI (@ANI) February 25, 2025
पंजाबच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्ह्यांच्या उपायुक्तांना पत्र लिहून म्हटले आहे की, येत्या काळात सरकार अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध मोठी मोहीम सुरू करणार आहे. या मोहिमेमुळे ड्रग्ज व्यसनाधीनांना अडचणी येऊ शकतात, त्यामुळे पुनर्वसन केंद्रांमध्ये सर्व व्यवस्था सुनिश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या केंद्रांमध्ये सर्व प्रकारची औषधे, चाचणी किट आणि उपकरणे असावीत. या केंद्रांवर सुविधांची खात्री करणे ही डीसींची जबाबदारी असेल आणि कोणत्याही प्रकारच्या निष्काळजीपणासाठी शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.
हे ही वाचा :
अमेरिकेकडून झालेल्या हद्दपारीच्या कारवाईनंतर पंजाबमधील ४० ट्रॅव्हल एजंट्सचे परवाने रद्द
ट्रम्प यांची पुतीन यांना साथ; संयुक्त राष्ट्रात युक्रेनविरोधात मतदान
११ मोबाईल, ९०० सिमकार्डचा वापर, उन्नावमध्ये ५ संशयित बांगलादेशींना अटक!
‘सकाळच्या भोंग्याला सुसंवाद शिकवा तरच राज्यातील संवादाची परिस्थिती सुधारेल!’
दरम्यान, सरकार केवळ ड्रग्ज तस्कर आणि पुरवठादारांवर कठोर कारवाई करणार नसून ड्रग्ज व्यसनींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुनर्वसन केंद्रे देखील पूर्णपणे तयार करणार आहे. ही मोहीम राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी राबवली जाईल आणि त्यावर उच्च पातळीवर देखरेख ठेवली जाईल. सरकारचे म्हणणे आहे की ही केवळ औपचारिकता नाही तर पंजाबला ड्रग्जमुक्त करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.