29 C
Mumbai
Monday, June 27, 2022
घरक्राईमनामाकामाला उशीर झाल्याने तुडुंब भरलेल्या बसला थांबवून त्याने काच फोडली!

कामाला उशीर झाल्याने तुडुंब भरलेल्या बसला थांबवून त्याने काच फोडली!

Related

कामावर जाण्यासाठी उशीर झाल्याने एका तरुणाने चक्क बसची काच दगडाने फोडल्याची घटना मालाड येथे घडली. त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपी तरुणाला सकाळी कामावर जाण्यासाठी उशीर झाला होता. त्यात बेस्टची बस तुडुंब भरल्यामुळे बसचालकाने बस थांबवली नाही. त्यामुळे संतापलेला आरोपी तरुण हा बसच्या पुढे आडवा आला व त्याने बस पुढे जाऊ दिली नाही.
बसमध्ये घेतले नाही याचा राग येऊन त्याने बस चालक आणि वाचकाला शिवीगाळ करून बसच्या काचा फोडल्या. ही घटना सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मालाड मीठ चौकी या ठिकाणी घडली असून बांगुर नगर लिंक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर तरुण हा मालाड मीठ चौकी परिसरात राहणारा असून त्याला वर्सोवा या ठिकाणी जायचे होते.

हे ही वाचा:

पहिली बायोटेक स्टार्टअप एक्स्पो पंतप्रधानांच्या हस्ते सुरू

४ तासांत दोन हत्यांच्या घटनेने मुलुंड हादरले!

‘आंदोलन करून कार्यकर्ते पंकजा मुंडेंचं नुकसान करणार’

मोबाईल काढून घेतला म्हणून मुलाची आत्महत्या

 

सदर तरुणाच्या या कृत्याचा व्हीडिओ व्हायरल झाला असून बसमध्ये बसलेल्या लोकांनी त्याचा व्हीडिओ करत पोलिसांकडे हा व्हीडिओ पाठवला. हा तरुण बसचालकाशी वाद घालताना व्हीडिओत दिसते. बस का थांबवली नाही म्हणून तो बसचालकाला शिव्या घालताना दिसतो. नंतर त्याने रस्त्यावर पडलेला दगड उचलून चालकाच्या समोर असलेल्या काचेवर जोराने आपटून काच फोडली. तीन वेळा त्याने हा दगड काचेवर मारला. त्यामुळे काचेला तडे गेल्याचे व्हीडिओत दिसते.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,937चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
11,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा