29 C
Mumbai
Thursday, September 24, 2026
घरधर्म संस्कृती"धर्म माणसाला बांधत नाही, तर मुक्त करतो"

“धर्म माणसाला बांधत नाही, तर मुक्त करतो”

सरसंघचालक मोहन भागवत यांचा तरुणांना संदेश

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

उज्जैनमध्ये आयोजित ‘युवा धर्म संसद-२०२६’ला संबोधित करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘धर्म’ आणि ‘रिलिजन’ यातील फरक स्पष्ट केला. ‘रिलिजन म्हणजे धर्म नव्हे, तर धर्म हा रिलिजनपेक्षा व्यापक आहे,’ असे भागवत यांनी सांगितले. धर्म हा केवळ एखाद्या विशिष्ट पंथ, परंपरा किंवा उपासना पद्धतीपुरता मर्यादित नसून सृष्टीच्या अस्तित्वाशी जोडलेला शाश्वत सिद्धांत असल्याचे त्यांनी म्हटले.

उज्जैनच्या गीता भवन येथे सेवाज्ञ संस्थानम् यांच्या वतीने १७ ते १९ सप्टेंबरदरम्यान ‘युवा धर्म संसद-२०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात देशातील २४ हून अधिक राज्यांमधून सुमारे १६०० ते १७०० युवक, विद्यार्थी, शिक्षक आणि धर्माचार्य सहभागी झाले आहेत. या मंचावर बोलताना भागवत यांनी धर्माचा अर्थ केवळ धार्मिक ओळख किंवा पंथाशी जोडणे योग्य नसल्याचे सांगितले. त्यांच्या मते, माणसाने धर्म समजून घेण्यासाठी मनात तयार झालेल्या पूर्वग्रहांपासून मुक्त होणे आवश्यक आहे.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंवर नरेश म्हस्केंचे गंभीर आरोप

विसर्जनानंतर घरी जाण्याची चिंता मिटली!

पाकिस्तानात गाडी विकत घेण्यास बंदी, लग्नात फक्त एक प्लेट जेवण!

मराठा आंदोलन बरबटलंय?

भागवत यांनी ‘रिलिजन’ या शब्दाच्या व्युत्पत्तीचाही संदर्भ दिला. ‘रिलिजन’ हा शब्द ‘रिलिगो’ या लॅटिन शब्दापासून आला असून त्याचा अर्थ बांधणे किंवा एका शिस्तीत ठेवणे असा होतो, असे त्यांनी सांगितले. याउलट धर्म माणसाला बांधत नाही, तर मुक्त करतो, असे त्यांचे म्हणणे आहे. धर्माच्या मूल्यांपासून दूर गेलेला रिलिजन सांप्रदायिक संघर्ष आणि धर्माच्या नावाने होणाऱ्या अत्याचाराला कारणीभूत ठरू शकतो, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे ‘रिलिजन म्हणजेच धर्म’ ही मनातील समज दूर करण्याची गरज असल्याचे भागवत यांनी नमूद केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा