30.5 C
Mumbai
Thursday, October 8, 2026
घरधर्म संस्कृती“अमेरिकेत हनुमानाची मूर्तीही सहन होत नाही?”

“अमेरिकेत हनुमानाची मूर्तीही सहन होत नाही?”

शशी थरूर यांच्या मुलाचा अमेरिकन युजरला सवाल

Google News Follow

Related

अमेरिकेतील हनुमानाच्या मूर्तीवर एका सोशल मीडिया वापरकर्त्याने केलेल्या टिप्पणीवरून वाद निर्माण झाला आहे. या टिप्पणीला कॉंग्रेस खासदार शशी थरूर यांचे पुत्र आणि पत्रकार ईशान थरूर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हिंदू धर्म आणि भारतातील ख्रिश्चन धर्माच्या इतिहासाचा संदर्भ देत त्यांनी संबंधित वापरकर्त्याला उत्तर दिले. या घटनेनंतर ईशान थरूर यांची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

‘जॅसी ह्यू’ नावाच्या सोशल मीडिया वापरकर्त्याने हनुमानाच्या मूर्तीचा फोटो शेअर केला होता. या पोस्टसोबत, “जेव्हा आम्ही जिंकू, तेव्हा ही मूर्ती पाडणार आहोत,” अशा आशयाची टिप्पणी करण्यात आली होती. या पोस्टवर ईशान थरूर यांनी प्रतिक्रिया देत भारतातील धार्मिक इतिहासाचा संदर्भ दिला. ईशान थरूर यांनी आपल्या उत्तरात म्हटले की, भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रवेश अमेरिकेत ख्रिश्चन धर्माच्या आगमनाच्या १५०० वर्षांहून अधिक काळ आधी झाला होता. भारतात हजारो चर्च असल्याचा उल्लेख करत त्यांनी अमेरिकेत हनुमानाची एक मूर्तीही सहन होत नाही का, असा सवाल उपस्थित केला. धार्मिक राष्ट्रवादावरही त्यांनी टीका केली.

हे ही वाचा:

“गणवेश नको, सेवा सुधारा!” पीआयएच्या नव्या गणवेशावरून वाद

मागण्या पूर्ण होईपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणार नाही!

विखे पाटील घराण्याची लेक स्वीडनच्या संसदेत

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाची बांगलादेशवर मात

ईशान थरूर हे काँग्रेस खासदार शशी थरूर यांचे पुत्र असून अमेरिकेतील पत्रकार म्हणून ओळखले जातात. ते आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि जागतिक राजकारणावर लेखन करतात. २०२६ मध्ये ते ‘द न्यू यॉर्कर’शी जोडले गेले असून ‘ग्लोबल नोट्स’ या आंतरराष्ट्रीय राजकारणाशी संबंधित स्तंभाचे लेखन करतात. यापूर्वी त्यांनी सुमारे दशकभर ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये काम केले आणि ‘वर्ल्डव्ह्यू’ या स्तंभासाठी लेखन केले. ईशान थरूर यांना २०२१ मध्ये अमेरिकन अकॅडमी ऑफ डिप्लोमसीकडून ‘आर्थर रॉस मीडिया अवॉर्ड फॉर कॉमेंट्री’ प्रदान करण्यात आला होता. सध्या ते कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्सचे २०२६-२७ एडवर्ड आर. मरो प्रेस फेलो आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा