28.1 C
Mumbai
Thursday, July 16, 2026
घरधर्म संस्कृतीवर्गीस पती-पत्नी करत होते धर्मप्रसार, वारकऱ्यांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न

वर्गीस पती-पत्नी करत होते धर्मप्रसार, वारकऱ्यांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न

पुण्यातल्या ससून रुग्णालयाजवळची घटना, बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल

Google News Follow

Related

पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्ण, त्यांच्या नातेवाईक आणि वारीतील वारकऱ्यांना ‘कृपासनम’ नावाची पत्रके वाटून ख्रिश्चन धर्माचा प्रचार केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सुनील वर्गीस आणि प्रतिमा सुनील वर्गीस यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून, तक्रार ऋषिकेश पांडे यांनी दिली आहे. येशूची प्रार्थना केलीत तर उपचार घ्यावे लागणार नाहीत, अशा अर्थाचा प्रचार हे जोडपे करत होते.

तक्रारीनुसार, १० जुलै रोजी ऋषिकेश पांडे हे आपल्या मित्रांसह ससून रुग्णालयात गेले असता, ओपीडीसमोर संबंधित पती-पत्नी ‘कृपासनम’ या शीर्षकाची पत्रके वाटत होते. तक्रारीत म्हटले आहे की, ते उपस्थितांना “येशूची प्रार्थना केली तर वैद्यकीय उपचारांपेक्षा लवकर बरे व्हाल,” असे सांगत होते. पत्रकांमध्ये येशूच्या प्रार्थनेमुळे अनेक आजार बरे झाले, नोकऱ्या मिळाल्या आणि अपत्यप्राप्ती झाली, अशा कथित अनुभवांचा उल्लेख करण्यात आला होता.

हे ही वाचा:

AIच्या शर्यतीत IBMला मोठा धक्का

मुंबईमधील कोस्टल रोडच्या बोगद्यात धावत्या कारला आग

मालेगावातील SIR प्रक्रियेत ‘व्होट जिहाद’? एकाच मतदाराची अनेक ठिकाणी नोंद

भारत ठेवणार प्रत्येक भारतीय खलाशावर लक्ष

तसेच, संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील उपचारासाठी आलेल्या वारकऱ्यांना “ख्रिश्चन धर्म हा इतर धर्मांपेक्षा श्रेष्ठ आहे,” असे सांगितल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ऋषिकेश पांडे यांनी आपल्या तक्रारीत असा आरोप केला आहे की, संबंधित दाम्पत्याने हिंदू धर्माचा जाणीवपूर्वक अपमान केला, त्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये केली आणि खोट्या आश्वासनांच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करून ख्रिश्चन धर्माचा प्रचार केला.

या तक्रारीच्या आधारे बंडगार्डन पोलिसांनी संबंधित पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा