गेल्या शनिवारी मालेगाव पालिकेच्या महापौरपदी नसरीन बानो (इस्लाम पक्ष) आणि उपमहापौरपदी शान-ए-हिंद (समाजवादी पार्टी) यांची निवड झाली. बुधवारी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचे छायाचित्र लावण्यात आले. शुक्रवारी ही बाब सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि शहरात एकच खळबळ उडाली. हिंदुत्वप्रेमी संघटनांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. हे कृत्य शहरवासीयांच्या भावना दुखावणारे आणि शासकीय नियमांची पायमल्ली करणारे असल्याची तक्रार शिवसेना शिंदे गटाने केली.
शासकीय कार्यालयात टिपू सुलतानचे छायाचित्र लावणे लोकांच्या भावना दुखावणारे कृती असल्याचे म्हणत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संजय दुसाने यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकारी आणि नवनिर्वाचित नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्या दालनाबाहेर घोषणाबाजी करत निवेदन सादर केले. शासकीय कार्यालयात फक्त अधिकृत यादीतील महापुरुषांचीच छायाचित्रे लावता येतात, याकडे लक्ष वेधून टिपू सुलतानचे छायाचित्र त्वरित काढण्यात यावे,अशी मागणी शिष्टमंडळातर्फे करण्यात आली. जोपर्यंत उपमहापौरांच्या दालनातून हा फोटो हटवला जात नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, असा पवित्रा या लोकप्रतिनिधींनी घेतला आहे. वाढता तणाव आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून महापालिका प्रशासनाने याविषयी तातडीने हालचाली केल्या. शनिवारी सकाळी नगरसचिव विभागाने हे छायाचित्र हटविण्याची कार्यवाही केली.
उपमहापौरांचे स्पष्टीकरण
या वादावर बोलताना उपमहापौर शान-ए-हिंद म्हणाल्या की,पदभार स्वीकारल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी हे छायाचित्र भेट दिले. त्यांच्या भावनांचा आदर करून दालनात हे छायाचित्र लावले. त्यामागे कोणताही दुसरा हेतू नव्हता.
“टिपू सुलतान हे स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला होता, असे त्यांनी म्हटले आहे. भाजपाच्या एका खासदारानेही टिपू सुलतान यांचे योगदान मान्य केल्याचा दाखला त्यांनी यावेळी दिला. महाराष्ट्र सरकारच्या एका अधिसूचनेचा संदर्भ देत त्यांनी विचारले की, विरोध करणारे हे लोक नेमके कोण आहेत?” टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्याबाबतही त्यांनी ठाम मतं मांडली आहेत.
नगर सचिव विभागाने ते काढले असेल तर माझे काहीच म्हणणे नाही, असेही त्या म्हणाल्या.यावरून निर्माण झालेल्या वादामुळे मालेगावातील वातावरण चांगलेच तापले होते. मात्र,हे छायाचित्र हटवून प्रशासनाने त्यावर पडदा टाकला आहे.
मुळातच या नवनिर्वाचित उपमहापौरांना टिपूचे चित्र लावले तर काय परिणाम होतील हे माहित नव्हते का ? याच सोपं उत्तर म्हणजे माहित होतं परंतु मुद्दाम हिंदूंना खिजवण्यासाठी, तेजोभंग करण्यासाठीच हा फोटो लावण्यात आला होता. जेणेकरून जाणीवपूर्वक दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊन अस्थिरता माजवण्यात येईल.
यावर कडी म्हणजे ‘टिपू सुलतानला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे’, असं काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य काँग्रेस हिंदू विरोधी असल्याचे अधोरेखित करणारे आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचा ३८३१ मतांनी पराभव झाला. या मतदारसंघातील धुळे ग्रामीण, शिंदखेडा , बाह्य मालेगाव, बागलन आणि धुळे शहर या ५ विधानसभा क्षेत्रातून भाजपला १,९०,४९६ मतांची आघाडी मिळाली, परंतु सहाव्या मालेगाव विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसला तब्बल १,९८,८६९ मते तर भाजपला केवळ ४,५४२ मते मिळाली.
हे ही वाचा:
दिल्लीत आजपासून ‘एआय’ परिषदेला सुरुवात
रोहित शेट्टी गोळीबार प्रकरण: हरियाणातून मुख्य शूटरसह चौघे गजाआड
सकाळच्या योगाभ्यासाला आलंय महत्त्व
पाकिस्तानचा टीम इंडियाने केला करेक्ट कार्यक्रम
‘डेमोग्राफी इज डेस्टिनी’..
वास्तविक, ‘डेमोग्राफी इज डेस्टिनी’ ही संकल्पना लोकसंख्याशास्त्राच्या अभ्यासातून उदयास आली आहे. भारतात गेल्या काही वर्षांपासून सीमावर्ती भागांत अवैध घुसखोरीचे कारस्थान पद्धतशीरपणे राबविले जात आहे आणि त्यामुळे मुस्लीम लोकसंख्येत होणारी वाढ हा चिंतेचा विषय ठरला आहे. जे जिल्हे हिंदूबहुल आहेत, तेथेही बाहेरून आलेल्या या घुसखोरांना वसविण्याचे कारस्थान उघड होत आहे. त्यामुळे नेमका या घुसखोरांवर कोणाचा वरदहस्त आहे, कोण यांना आश्रय देतो, याबाबत वेगळे काही सांगण्याची गरज नाही.
देशात मुस्लीम लोकसंख्या वाढवून ‘शरिया’ लागू करण्याच्या दिशेने टाकलेली ही पाऊले म्हणता येतील. एकप्रकारे भारतावर इस्लामी राजवट आणण्याचेच हे प्रयत्न आहेत. हे यापूर्वी दहशतवाद्यांवर, त्यांच्या समर्थकांवर केलेल्या कारवायांमधूनही स्पष्ट झाले आहेच. थोडयात सांगायचे, तर ‘गझवा-ए-हिंद’ या जिहाद्यांनी भारताला दिलेल्या नुसत्या पोकळ धमक्या किंवा कोणतेही कागदोपत्री नियोजन नाही, तर त्यादृष्टीनेच धर्मांधांनी भारताला पोखरण्याचेच हिरवे उद्योग चालविले आहेत. म्हणूनच हिंदूंनी हा डाव समजून घेणे महत्त्वाचे आहे.
भाजपला, हिंदुत्वासाठी काम करणाऱ्यांना मुस्लिम का पराभूत करू इच्छितात, हे लक्षात घ्यावे लागेल, केंद्र सरकारची १० वर्षातील उतुंग कामगिरी, जम्मू काश्मिरातील दहशतवाद आता शेवटच्या घटका मोजत आहे.. शिवाय संपूर्ण देशभरात एका ठिकाणी देखील बॉम्बस्फोट झाला नाही हे सरकारचे मोठे यश आहे, विभाजनकारी कलम ३७० आता इतिहास झाले आहे, ५०० वर्षाच्या प्रतीक्षेनंतर श्रीराम मंदिर निर्माण, सीएए त्यामुळे भाजपला सत्तेतून दूर करायचे आहे, ही मुख्य भूमिका, त्यासाठी योजनाबद्ध मतदान मुस्लिम समाज नेहमीच करत आला आहे..
शिवसेना मुस्लिमांच्या कधीच बाजूने नव्हती, ती नेहमी विरोधातच होती, तरीही यावेळी उबाठाला भरघोस मतदान मुसलमानांनी केले, अनेक बूथवर महायुतीच्या उमेदवारांना २ अंकी मते देखील मिळाली नाहीत, याचाच अर्थ भाजपला हरवणे एवढेच एकमात्र उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.-वाढत्या हिंदुत्वाची मुसलमानांना भीती वाटते. परंतु हिंदू बहुसंख्य राजवटीची भीती दाखवून पाकिस्तानची मागणी करण्यात आली होती हे मात्र जिहादींचे समर्थन करणारे, मुसलमानांचे लांगुलचालन करणारे काँग्रेसी पूर्णपणे विसरतात..
मुसलमानांचे मतदान हे धर्मासाठीच..
कुणी कितीही वल्गना केल्या, तरी मुसलमानांचे मतदान हे धर्मासाठीच होते, हे हिंदूंनी समजून घ्यावे. हिंदूंचा हिंदू म्हणून उत्कर्ष मुसलमानांना सहन होत नाही. शाहबानो प्रकरणात मुसलमान सर्वाेच्च न्यायालयाच्या बाजूने उभे राहिले नाही, तर त्यांनी इस्लामचाच पुरस्कार केला. याकूब मेमन राष्ट्रविरोधी कार्यामध्ये सहभागी असला, तरी त्याच्या अंत्ययात्रेला लाखोंच्या संख्येने ‘मुसलमान’ म्हणून सहभागी झालेला समाज ‘मुसलमान’ म्हणून मतदान करत नाही, असे समजणे, म्हणजे निव्वळ मूर्खपणा होय.
असदुद्दीन ओवैसीने ‘एक दिवस भारताची पंतप्रधान हिजाब घालणारी महिला होईल’, असे म्हटले होते. एक तर हे लोकशाही मार्गाने शक्य आहे; परंतु ओवैसी यांच्या बोलण्याला लोकशाहीची झालर नसून त्यात धर्मांधतेचे विष आहे. हिजाबधारी महिलेला भारताचे पंतप्रधान करणे, म्हणजे देशात मुसलमानांचा प्रभाव वाढवणे, हा त्यांचा सरळसरळ अर्थ आहे. भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या दृष्टीने मुसलमानांचे होत असलेले मार्गक्रमण हे देशाच्या दृष्टीने धोकादायक आहे. धर्मांध उद्देश ठेवून लोकशाहीमध्ये मतदानाद्वारे हा हेतू साध्य केला जात असेल, तर हेही निवडणुकीच्या नियमाचे उल्लंघनच होय आणि ते राष्ट्रासाठी घातक आहे. राष्ट्रप्रेमी नागरिक म्हणून आपण याविषयी सतर्क रहाणे आवश्यक आहे !







