28 C
Mumbai
Friday, December 26, 2025
घरधर्म संस्कृतीश्रीदेव रवळनाथ पंचायतन देवस्थानचा पुनःप्रतिष्ठापना महोत्सव

श्रीदेव रवळनाथ पंचायतन देवस्थानचा पुनःप्रतिष्ठापना महोत्सव

तीन दिवस चालणार महोत्सव

Google News Follow

Related

पेडणे, गोवा येथे श्री देव रवळनाथ पंचायतन दैवतांचा पुनःप्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून १५, १६ व १७ फेब्रुवारी २०२५ रोजी हा महोत्सव होणार आहे. यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन या महोत्सवाची माहिती देण्यात आली. तब्बल ६०० वर्षांनंतर ही पुनःप्रतिष्ठा होणार असल्यामुळे सर्व भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

महाजन , सेवेकरी व समस्त भक्तगण व श्रीदेवीभगवती रवळनाथ व तद्‌नुशांगिक देवालय समितीच्या वतीने शनिवार, रविवार व सोमवार १५, १६ व १७ फेब्रुवारी २०२५ रोजी शके १९४६ माघवद्य तृतीया, चतुर्थी व पंचमी रोजी रवळनाथ पंचायतन देवस्थानचा पुनःप्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या तीन दिवसातील कार्यक्रम असे असतील.  शनिवार १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ८.०० वा, यजमानांस प्रायश्चित, शरीरशुद्धी, कुष्मांड होम, देवता प्रार्थना, पुण्याहवाचन सकाळी ९.०० वा, दीप प्रज्वलन, ब्राह्मणवरण, सुहासिनींतर्फे गंगापुजन, प्राकारशुद्धी, शांतिहोम, जलाधिवासः मंडप प्रतिष्ठाः शांतिपाठ तद्नंतर महाप्रसाद, संध्या. ३.०० वा, सौ. सम्म्राज्ञी शेलार (अहिर) गोवा यांचा गायनाचा कार्यक्रम, संध्या. ५.०० वा, पांडुरंग राऊळ, राजप्रभू धोत्रे, गणेश पार्सेकर, तुळशीदास नावेलकर, दत्तराज सुर्लकर व अनिल पंडित, बहारदार भजन संध्या कार्यक्रम रात्रौ ८ वाजता होणार आहे. तसेच महापुरुष तरुण हौशी नाट्यमंडळ बांदोळवाडा पेडणे-गोवा सामाजिक दोन अंकी नाटक रानफुलाचे आयोजन करण्यात आले.

रविवार १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ८.०० वा, प्राकारशुद्धी, शिखर कलशविधी, देवता स्नान विधी, अधिवासन, ग्रहयाग, वास्तुयाग, प्रासाद तत्वन्यास, पर्यायहोम होणार आहे तर दुपारी १२.०० वा, वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य, राष्ट्रीय अध्यक्ष – धर्मसभा विद्वत्संघ, श्रीमज्जगद्‌गुरु शंकराचार्य पीठम्, वसई (मुंबई) यांच्या हस्ते कलशारोहण वास्तुप्रतिष्ठा, पिंडीका स्थापना तद्नंतर महाप्रसाद, दुपारी ३.०० वा, राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प. सुहास बुवा वझे यांची शिष्या ह.भ.प. कु. आकांक्षा अमोल प्रभू (सातार्डा-महाराष्ट्र) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.

हे ही वाचा:

काही लोकांनी लपून-छपून महाकुंभात स्नान केले आणि जनतेला सांगतात जाऊ नका!

योगी आदित्यनाथांचा फेक व्हीडिओ केला तयार, आरोपीचा शोध सुरू

कुटुंबीयांनी विवाहास नकार दिल्याने प्रेमी युगुलाकडून विष प्राशन

वादानंतर समय रैनाने ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शो चे सर्व व्हिडीओ हटवले

संध्या. ४.३० वा, विठ्ठल गावस, गितेश इंफाळकर, कपिल गांवस हार्मोनियम – दिगंबर गांवस तबला – मयुर गावडे व साथी कलाकार यांचा भजनाचा कार्यक्रम अयोजन करण्यात आले तर संध्या. ७.०० वा, मुंबई येथील प्रख्यात गायक श्री. रघुनंदन पणशीकर व सौ. नंदिनी वेडेकर यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होणार आहे.

या महोत्सवामध्ये सोमवार १७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ६.३० वा, आवाहित देवतापुजन, देवता मधुपर्क पुजा, सकाळी ८.०० वा, होणार आहे तर देवता भारी रुपाने श्रीमत् जगद्‌गुरु शंकराचार्य स्वामी महाराज परमपूज्य विद्यानृसिंह भारती स्वामी, करवीरपीठ, कोल्हापूर यांच्या उपस्थितीत देवताप्रतिष्ठा तत्वन्यांस, प्राणप्रतिष्ठा, महापुजा, पुजांगहोम, बलिदान, पुर्णाहुति, महाआरती, महागाऱ्हाणे, महानैवेद्य ब्राह्मण सर्तपण, दक्षिणादान, आशिर्वादाचा कार्यक्रम होणार आहे तर संध्या. ५.०० वा, राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. श्री. हरीहस्बुवा नातु (पूणे) यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. त्यानंतर रात्रौ ८.०० वा. : श्री देव रवळनाथ उत्सवमूर्तीचा पालखी उत्सवाला सुरूवात होणार आहे तर त्यानंतर रात्रौ ८.३० वा. पंडित आनंद भाटे पुणे यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे, असे श्री देवी भगवती, रवळनाथ व तद्‌नुशांगिक देवालय समिती व महाजन पेडणे-गोवा मंदीर समितीच्या वतीने सांगण्यात आले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा