भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला २०२२ मध्ये जीवघेण्या कार अपघातानंतर वाचवण्यास मदत करणाऱ्याने त्याच्या प्रेयसीसह विष प्राशन केले. ते वेगवेगळ्या जातीचे असल्यामुळे त्यांच्या घरच्यानी हे नाते नाकारल्याने त्यांनी हे पाउल उचलले. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात हा प्रकार घडला. यामध्ये प्रेयसीचा मृत्यू झाला आहे. मन्नू (२१) असे तिचे नाव आहे. तर प्रियकर रजत (२५) सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. हे दोघे उत्तराखंड शहराच्या अगदी जवळ असलेल्या बुच्चा गावातले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रजत आणि मन्नू यांनी ९ फेब्रुवारीला महिलेच्या पालकांनी तिचे लग्न दुसऱ्या व्यक्तीसोबत निश्चित केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हे कठोर पाऊल उचलले. दोन्ही कुटुंबांकडून कोणतीही औपचारिक तक्रार नसली तरी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
हेही वाचा..
शहरी नागरिकांसाठी आता प्रधानमंत्री आवास योजना २.० ची अंमलबजावणी
बांगलादेशात हिंदू अल्पवयीन मुलीचे अपहरण, ९ दिवस उलटूनही तपास नाही!
काही लोकांनी लपून-छपून महाकुंभात स्नान केले आणि जनतेला सांगतात जाऊ नका!
योगी आदित्यनाथांचा फेक व्हीडिओ केला तयार, आरोपीचा शोध सुरू
तपासाबद्दल मुझफ्फरनगरचे पोलीस अधीक्षक सत्यनारायण प्रजापत म्हणाले की, तपासादरम्यान समोर आलेल्या पुराव्याच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. रजत आणि त्याचा मित्र निशू डिसेंबर २०२२ मध्ये त्यांच्या गावी परतत असताना त्यांना रुरकीमध्ये ऋषभ पंतची जळत असलेली मर्सिडीज कार दिसली. त्यांनी ताबडतोब त्याला वाचवण्यास आणि रुग्णालयात नेण्यास सांगितले. पंत दिल्लीहून उत्तराखंडला परतत असताना हा अपघात झाला होता.