बांगलादेशातील अल्पसंख्यांक विशेषतः हिंदूंवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. चोरी, तोडफोड, मारहाण, अत्याचार, अपहरण आणि हत्येच्या घटना दररोज घडत आहेत. कट्टरवादी हल्लेखोरांवर युनुस सरकार कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीये. केवळ जगासमोर कारवाईचे आश्वासन दिले जात आहे. याच दरम्यान, आणखी एक घटना समोर आली आहे. हिंदू अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचे समोर आले आहे. मुलीच्या पालकांकडून तपासणीची मागणी केली जात आहे. मात्र, स्थानिक पोलीस नजर अंदाज करत आहेत.
बांगलादेशातील दिनाजपूर जिल्ह्यातील ही घटना आहे. लबोनी रे असे अपहरण झालेल्या अल्पवयीन हिंदू मुलीचे नाव आहे. विशेष म्हणजे, मुलीचे अपहरण होवून तब्बल ९ दिवस उलटले आहेत. मात्र, स्थानिक पोलीस हातावर हात ठेवून शांत बसण्याची भूमिका पार पडण्याचे काम करत आहेत. मुलीच्या पालकांनी हात जोडून पोलिसांना आणि सरकारला तपासणीची मागणी केली आहे. परंतु पोलिसांकडून अध्याप कारवाई अथवा तपासणी केल्याचे समोर आलेले नाही.
हे ही वाचा :
लालूप्रसाद यादव म्हणतात, जब तक बिहार मे है लालू…
अमेरिकेच्या उपाध्यक्षांच्या मुलांना मोदींनी दिलेल्या भेटवस्तूंमधून भारतीय संस्कृतीची ओळख
निवडणुक अर्जात खरी माहिती लपवून ठेवल्याप्रकरणी धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस
युक्रेन- रशिया युद्ध संपणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा चर्चेसाठी पुढाकार
दरम्यान, यापूर्वी काही दिवसांपूर्वी एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले होते. पिडीत मुलीच्या पालकांनी तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली होती. विशेष म्हणजे, पिडीत मुलीच्या पालकांनी अपहरण कर्त्यांची नावे आपल्या तक्रारीत नमूद केली होती. मात्र, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे तेथील हिंदू भयभीत झाला आहे. दोन दिवसांपूर्वी एका हिंदू कुटुंबाच्या घरातील देवीच्या मूर्ती तोडल्याची घटना घडली होती. मध्यरात्री अंधारचा फायदा घेत कट्टरवाद्यांनी घरात शिरकाव केला आणि देवाऱ्यातील देवीच्या मूर्ती तोडून टाकल्या होत्या.
9 days has been past since, Hindu minor girl Laboni Ray was kidnapped.
Still, Bangladesh police has not taken any step to rescue the girl.
Location : Dinajpur district pic.twitter.com/0yvNZDXhyU— Joy Das 🇧🇩 (@joydas1844417) February 12, 2025