दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा बिहारवर कोणताही परिणाम होणार नाही, असे राजद सुप्रीमो लालू यादव यांनी म्हटले आहे. बिहारमध्ये त्यांचा पक्ष सरकार स्थापन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लालू यादव आगमी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हणाले, बिहारमधील लोकांना मोफत वीज, रोजगार आणि सरकारी नोकऱ्या दिल्या जातील.
दिल्ली निवडणुकीच्या निकालांवर लालू यादव म्हणाले, याचा बिहारच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही. त्यांनी जोर देत म्हटले, जोपर्यंत मी आणि माझा पक्ष उपस्थित आहे, तोपर्यंत बिहारमध्ये दुसरा कोणताही पक्ष सरकार स्थापन करू शकत नाही. लालू यादव यांनी त्यांच्या शैलीत सांगितले की, आम्ही इथे असताना दुसरे कोणी सरकार कसे बनवू शकते. आम्ही सध्या इथे आहोत, मग कोणी इतक्या सहजपणे सरकार कसे स्थापन करू शकते?. बिहार समजून घेणे सोपे नाही, ते पुढे म्हणाले.
लालू यादव म्हणाले, जर आमचे सरकार आले तर बिहारमधील लोकांना मोफत वीज दिली जाईल, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, सरकारी नोकऱ्यांमध्येही वाढ होईल. आम्ही जे बोलतो ते करतो. बिहारच्या लोकांना कधीही निराश होऊ देणार नाही, असे यादव म्हणाले.
हे ही वाचा :
अमेरिकेच्या उपाध्यक्षांच्या मुलांना मोदींनी दिलेल्या भेटवस्तूंमधून भारतीय संस्कृतीची ओळख
निवडणुक अर्जात खरी माहिती लपवून ठेवल्याप्रकरणी धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस
युक्रेन- रशिया युद्ध संपणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा चर्चेसाठी पुढाकार
प्लिज, प्लिज एकाने तरी नाराज व्हा!
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बिहारमध्ये निवडणुका