25 C
Mumbai
Thursday, February 9, 2023
घरसंपादकीयअपमान करून घेण्याची हौस...

अपमान करून घेण्याची हौस…

आदित्य ठाकरे यांनी तेच तेच प्रश्न विचारताच त्यांना रोखठोक उत्तर देण्यात आले.

Google News Follow

Related

वाट्टेल ते बोलायचे आणि समारेच्याकडून तोंड फोडून घ्यायचे अशी हौस काही नेत्यांना जडलेली असते. शिवसेना उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे त्यात आघाडीवर आहेत. काल विधानसभेत रस्ते सुरक्षेच्या मुद्यावर प्रश्न विचारताना त्यांना व्हाया गुजरात गुवाहाटीचा रस्ता आठवला आणि उत्तरा दाखल त्यांनी व्यवस्थित अपमान करून घेतला.

शिवसेना फुटल्याची जखम अजूनही ताजी आहे. ठाकरे पिता-पुत्रांना ही जखम कायम ठसठसत असते. त्यामुळे बोलताना कोणताही विषय ते गुवाहाटीच्या दिशेने घेऊन जातात. राजकारणात विरोधकांना नामोहरम करण्यासाठी उपहासासारखे शस्त्र नाही. परंतु हे शस्त्र वापरण्यासाठी राजकारणाबरोबरच विनोदाची उत्तम जाण असणे अपेक्षित असते. ठाकरे घराण्यातील विनोदाची धार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत संपली. त्यांच्यानंतर फक्त टोमणे आणि फालतू कोट्या.

उद्धव ठाकरे यांना तर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी टोमणे सम्राट हे बिरुदच बहाल केले आहे. टोमण्यांच्या वापराचा विचार केला तर आदित्य ठाकरे म्हणजे बाप से बेटा सवाई अशी परिस्थिती आहे. महाविकास आघाडीची सत्ता असताना आदित्य ठाकरे यांचा तोरा होता. त्यांनी केलेल्या फालतू विनोदाचे आघाडीतील नेते मंडळी बाकं बडवून कौतुक करीत. आता चित्र १८० अंशाच्या कोनात बदलले आहे. शिउबाठात आता जेमतेम १४ आमदार शिल्लक आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे काही वावगं बोलले तर सत्ताधारी शिंदे गट त्यांना हाणण्यासाठी तयारच असतो.

मुंबई-सुरत रस्त्याबाबत आदित्य ठाकरे यांनी प्रश्न विचारला. या रस्त्यावर लोक सकाळी पडतात, रात्री पडतात तेव्हा या रस्त्याचा दर्जा सरकारने एकदा तपासून घ्यावा. हा रस्ता एकदा दुरूस्त झाला तर तिथून धावता येतं, पळता येतं, गुवाहाटीलाही जाता येतं, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

प्रश्न विचारताना मंत्री महोदयांचा उल्लेख त्यांनी काळजीवाहू असाही केला. या प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांची पिसं काढली नसती तरच नवल होते. प्रश्नात काहीच नवे नाही, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा प्रश्नच आदित्य ठाकरे यांनी पुन्हा विचारलेला आहे. रस्ते सुरक्षेबाबत विचारलेल्या प्रश्नात मी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. आदित्यजींनी सुरतच्या रस्त्याची धास्ती घेतलेली आहे, जे काही शिल्लक सेनेत उरले आहेत, त्यांना त्या रस्त्याचा वापर करायला लागू नये याची काळजी घ्या, असा सणसणीत टोलाही लगावला.

अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. सभागृहातील वातावरण चांगले ठेवण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांची पुन्हा एकाद पिसं काढली.
रस्त्याबद्दल बोलताना कोण सुरतला गेले, कोण गुवाहाटीला गेले याबद्दल चर्चा कशाला. गेले ते गेले, आता संपला तुमचा विषय, असे सांगून गुलाबराव पाटील यांनीही आदीत्य यांचे कान उपटले.

हे ही वाचा:

मुंबई मेट्रो लाइन ३ ची गाडी तय्यार!

वर्ल्डकप जिंकूनही अर्जेंटिना नंबर वन नाहीच!

आफताबनंतर आता रियाझ…हिंदू तरुणीची हत्या करून मृतदेह फेकला नदीत

भारत जोडो यात्रा पुढे ढकला…राहुल गांधींना पत्र

ही पिटाई होत असताना आदित्य ठाकरे यांच्याकडे शांत बसून ऐकण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. गुलाबराव त्यांची धुलाई करीत असताना शिवसेना उबाठाचा एकही आमदार त्यांना आडवा आला नाही. काल सभागृहात हे घडत असताना ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल येत होते. या निकालात शिवसेना उबाठा शेवटून पहिल्या क्रमांकावर आहे. निकालामध्ये इतरांना मिळालेल्या जागांपेक्षा कमी जागा या पक्षाला मिळालेल्या आहेत. शिवसेना फुटल्यानंतर सहानुभूती मिळेल आणि या सहानुभूतीच्या बळावर पुन्हा सत्ता मिळेल हे गृहितक आता फसत चालले आहे.

बाळासाहेबांची शिवसेना या पक्षासोबत फक्त खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी गेले नसून कार्यकर्ते आणि मतदारही गेले आहेत, असा निष्कर्ष ग्रामपंचायत निवडणुकींच्या ताज्या निकालावरून काढता येऊ शकतो. शिवसेनेचा जीवनरस शोषून राष्ट्रवादी काँग्रेस वाढत होती, हा एकनाथ शिंदे यांचा आरोपही हे निकाल स्पष्ट करतायत. परंतु या सगळ्या गोष्टी नजरेआड करून ठाकरे पिता-पुत्र सतत गुवाहाटीचे टुमणे लावत आहेत.

हाता तोंडाशी आलेली सत्ता ज्या सद्गुणांमुळे गेली त्या सद्गुणांना ठाकरे अजूनही चिकटून आहेत. नागपूर विधी मंडळ अधिवेशाची सुरूवात या पक्षाने पक्ष कार्यालय गमावण्यापासून केली. प्रत्येक जात्या दिवसात हा पक्ष काही ना काही गमावतो आहे. परंतु जे काही घ़डते आहे त्यात आपले काही चूकते आहे. आपण कुठे तरी कमी पडतो अशी भावना पक्षाच्या नेतृत्वाला शिवतही नाही. आणि त्यामुळे दुसऱ्याला दोष देण्याच्या पलिकडे ठाकरे पिता पुत्र काही करताना दिसत नाहीत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,906चाहतेआवड दर्शवा
2,003अनुयायीअनुकरण करा
61,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा