31 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
घरसंपादकीयलोकसभेच्या तोंडावर घातपाताचे अरिष्ट टळले...

लोकसभेच्या तोंडावर घातपाताचे अरिष्ट टळले…

कोलकात्यात अटक केल्यामुळे महत्त्वाचे धागेदोरे हाती लागतील

Google News Follow

Related

एनआयएने बंगळूरु येथे १ मार्च रोजी रामेश्वर कॅफेमध्ये झालेल्या आयईडी ब्लास्टचे आरोपी मुस्सरीव हुसेन शाहजीब आणि अब्दुल मतीन ताहा यांना कोलकाता येथून अटक केली. अत्यंत धाडसी कारवाई करून एनआयएने दक्षिण भारतात चार वर्षे सक्रीय असलेल्या एका खतरनाक मॉड्यूलचा अंत केलेला आहे. २०२० मध्ये तीर्थहळ्ळी येथे झळकलेल्या जातीय विद्वेष पसरवणाऱ्या भित्तीचित्रांमुळे हे मॉडेल प्रकाशात आले होते. या दोघांना अटक झाली नसती तर लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीत मोठा घातपात होण्याची शक्यता होती.

कर्नाटक हा इस्लामी दहशतवाद्यांचा मोठा गड राहिलेला आहे. २००० च्या पहिल्या दशकात ज्या इंडीयन मुजाहिदीनने देशात कित्येक स्फोट घडवले, शेकडो लोकांचे बळी घेतले त्या संघटनेचे म्होरके रियाज आणि इक्बाल भटकळ हे मुळचे कर्नाटकच्या भटकळमधले. कट्टरवादाची पाळेमुळे इथे खोलवर रुजलेली आहे. केंद्र सरकारने बंदी घातलेल्या पीएफआयचे इथे मोठे जाळे आहे. कर्नाटकच्या तीर्थहळ्ळीमध्ये २०२० मध्ये जातीय तणाव वाढवणारी पोस्टर झळकली होती. कर्नाटक पोलिसांना तातडीने कारवाई करत याप्रकरणातील दोषी माझ मुनीर, मोहम्मद शरीक, तीर्थहल्ळी, सईद यासीन यांना अटक केली तेव्हा पासून हे पोलिसांच्या रडारवर आहेत. काही काळानंतर हे जामीनावर बाहेर आले.

कधी कधी एखाद्या छोट्या गुन्ह्याचा तपास करता करता तपास यंत्रणांना मोठे घबाड हाती लागते. १५ ऑगस्ट २०२२ मध्ये शिवमोगा येथे भोसकाभोसकीची घटना झाली. याप्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती तुंगा नदीच्या काठावर आय़ईडी स्फोटाचे धागेदोरे हाती लागले. कर्नाटकमध्ये एक इस्लामी कट्टरवाद्यांचे एक मॉड्यूल सक्रीय झाल्याची पोलिसांना खात्री झाली. देशात मोठा घातपात घडवण्याची तयारी सुरू असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच युद्धपातळीवर तपास सुरू झाला. तीर्थहळ्ळी येथे जातीयवादी पोस्टरबाजीच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेले आणि नंतर जामीनावर बाहेर आलेले माझ मुनीर, सईद यासीन या प्रकरणात पुन्हा जाळ्यात आले. मोहम्मद शरीक मात्र पळाला.

ऑक्टोबर २०२२ मध्ये कोईमतूरमध्ये स्फोट झाला. यावेळी हा कारबॉम्ब होता. अरुलमिगु कोट्टाई संगमेश्वर थिरुकोवील या प्राचीन मंदीराला लक्ष्य करण्याचा प्रयत्न होता. कार चालवणारा जमेशा मुबीन हा स्फोटात ठार झाला. हा सुद्धा आयईडी स्फोट होता. मुबीने मोहम्मद अझररुद्दीन, हिदायतुल्ला शेख, सनोफर अली, उमर फारुख या टोळक्याने कोईमतूरमध्ये आत्मघाती हल्ल्याचा कट आखला होता. तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यातील सत्यमंगलमच्या दाट जंगलात हे कारस्थान शिजवण्यात आले होते. नोव्हेंबर २०२२ मध्ये मंगळूरू येथे झालेल्या कुकर ब़ॉम्बस्फोट प्रकरणात. काद्री मंजुनाथ मंदीरात हा स्फोट करण्याचा कट होता. हा कुकर बॉम्ब रिक्षातून नेताना स्फोट झाला. हा स्फोट झाल्यानंतर कर्नाटकचे पोलिस महासंचालक प्रवीण सुद यांनी तात्काळ जाहीर केले की हा अपघात नाही घातपात आहे.

तुंगा नदीच्या काठाच्या झालेल्या चाचणी स्फोटातील फरार आरोपी मोहम्मद शरीक हा कुकर घेऊन चालला होता. कुकरचा स्फोट झाल्यामुळे तो जखमी झाला. कोईमतूर आणि मंगळुरू येथे झालेले घातपाती स्फोट मंदिरांना लक्ष्य करण्यासाठीच घडवण्यात आले होते. सुदैवाने दोन्ही स्फोट कमी क्षमतेचे असल्यामुळे फार हानी झाली नाही. जेव्हा बंगळूरुतील रामेश्वरम कॅफेमध्ये आयईडी स्फोट झाला तेव्हा. मंगळूर आणि कोईमतूर मध्ये झालेल्या स्फोटांशी याचा संबंध असल्याचे एनआयएने ताडले. त्या दिशेने तपास सुरू झाला.

याप्रकरणात सीसीटीव्ही फूटेजवरून शब्बीर हा आरोपी तपास यंत्रणांच्या जाळ्यात आला. त्याने या प्रकरणातील मास्टरमाईंडची नावे उघड केली. त्यानंतर मस्सवीर हुसेन शाहजीब आणि अब्दुल मतीन ताहा याचा कसून शोध सुरू झाला. महीनाभर हे आरोपी तपास यंत्रणांना झुकांडी देत पळत होते. तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि प.बंगालचे पोलिस केंद्रीय तपास यंत्रणांच्या सोबत या दुकलीचा शोध घेत होते. अखेर कोलकात्यात दोघांना अटक करण्यात आली. शाहजीब याने मोहम्मद जुनेद सईद आणि ताहाने विघ्नेश हे बनावट नाव धारण केले होते. त्यांच्याकडे ही बनावट ओळख सिद्ध करण्यासाठी आधारकार्डसह बाकी ओळखपत्रही होती.

२००० च्या पहिल्या दशकात देशात दहशतवादाचा नंगा नाच सुरू झाला होता. सातत्याने कुठेना कुठे स्फोट होत होते. बस, रेल्वे, मंदिरे, नद्यांचे घाट, बाजारपेठा कोणतेही स्थान सुरक्षित नव्हते. दहशतवाद्यांची भीड इतकी चेपली की, २००८ मध्ये मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला केला गेला. देशात अशी परिस्थिती निर्माण झाली की घरातून बाहेर गेलेला माणूस परतेल की नाही अशी शंका घरातल्या लोकांना छळत असे. देशात २०१४ मध्ये सत्ता पालट झाल्यानंतर बॉम्बस्फोट आणि दहशत या दोन्ही शब्दांचा देशवासियांना विसर पडला. कट्टरवाद्यांच्या आधीच मुसक्या आवळण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली. पीएफआयवर आणलेली बंदी उदाहरणादाखल सांगता येईल.

हे ही वाचा:

वानखेडेवर ‘सूर्या’ तळपला!

बघू आता तुम्हाला ‘राम’ वाचवतो की ‘हिंदू धर्म’!

शाब्बास डीके! रोहीतची कार्तिकला कौतुकाची थाप…

“आम आदमी पार्टीला १०० कोटी रुपयांची लाच देण्यात के कविता यांची महत्त्वाची भूमिका”

कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये झालेले कमी क्षमतेचे आईडी स्फोट मात्र तपास यंत्रणांना धक्का देऊन गेले. २०२० पासून हे टोळके दक्षिण भारतात सक्रीय झाले होते. मंदिरांना लक्ष्य करून देशात जातीय तणाव निर्माण करण्याचे, हिंदूंना लक्ष्य करण्याचा त्यांचा उद्देश होता. रामेश्वर कॅफेमध्ये झालेल्या स्फोटातील दोन आरोपी फरार असल्यामुळे तपास यंत्रणा चिंतेत होत्या. जोपर्यंत हे बाहेर आहेत, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीत एखादा मोठा घातपात होऊ शकतो, अशी शक्यता होती. एनआयएने कोलकात्यातून या दोन दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्यानंतर आता ही शक्यता संपुष्टात आलेली आहे. एका मॉड्युलचा पूर्णपणे बीमोड झाला आहे. या मॉड्यूलचे सुत्रधार कुठे बसलेले आहेत, त्यांचे प्रेरणास्थान लष्कर ए तोयबा होते कि इस्लामिक स्टेट्स ही माहिती तपासात उघड होईलच. परंतु एक नवे मॉड्यूल कार्यरत होईपर्यंत देशावर आलेले अरीष्ट टळलेले आहे. एनआयएसह देशातील सर्व तपास यंत्रणांचे मन:पूर्वक अभिनंदन.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा