31 C
Mumbai
Saturday, November 15, 2025
घरसंपादकीयAI बुडबुडा फुटणार; वॉरेन बफेनंतर डॉक्टर बरीने दिले संकेत...

AI बुडबुडा फुटणार; वॉरेन बफेनंतर डॉक्टर बरीने दिले संकेत…

Google News Follow

Related

अमेरिकेचा नॅसडॅक लवकरच कोसळणार अशी भाकीते अनेक बड्या वित्तसंस्था आणि तज्ज्ञ करीत आहेत. जगातील बड्यांनी तसे संकेत द्यायला सुरूवात केली आहे. अशाच गुंतवणूकदारांपैकी एक बर्कशायर हॅथवेचे सर्वेसर्वा वॉरन बफे यांनी गेल्या काही महिन्यांपासून गुंतवणूक बंद केलेली आहे. ते फक्त माल विकतायत. शेअर बाजाराचा बुडबुडा लवकरच फुटणार ही चर्चा त्यामुळे जोरात सुरू झाली आहे. २००० साली अमेरिकी शेअर बाजाराला हादरे देणारा डॉटकॉम बबल असो वा २००८ चा सबप्राईम क्रायसिस, शेअर बाजारावर आलेल्या या दोन्ही गंडांतराचे अचूक भाकीत कऱणाऱ्या मायेकल बरी या गुंतवणूकदाराने NVIDIA आणि PALANTIR या कंपन्यांचे पुट ऑप्शन घेतल्यामुळे त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भयाचे वातावरण आहे.

अमेरिका ही आर्थिक महासत्ता आहे. असे म्हणतात अमेरिकी शेअर बाजाराला ताप आला की जगातील अन्य शेअर बाजारांना हुडहुडी भरते. अमेरिकी शेअर बाजाराचा बुडबुडा लवकरच फुटणार अशी कुजबुज सतत होत असल्यामुळे भारतासह जगभरातील गुंतवणुदारांना घाम फुटलेला आहे.

अमेरिकेत आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) क्षेत्रातील कंपनींच्या शेअर बाजारात बबल फुटण्याचा संकेत आहे. अमेरिकी तज्ज्ञ जी भीती व्यक्त करतायत त्यामागे अमेरिकी शेअर बाजाराचा इतिहास आहे. हा काही बाजारातील पहीला बुडबुडा नाही. असे बुडबुडे यापूर्वी सुद्धा फुटले आहेत. त्यामुळे जगभरातील गुंतवणुकदारांनी कष्टाची अब्जावधीवधीची कमाई गमावली आहे.

हे ही वाचा:

स्ट्रेस आणि टेन्शनला म्हणा अलविदा

दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान पॅराट्रूपर जखमी

शरीराच्या संपूर्ण आरोग्यासाठी वरदान : आरोग्यवर्धिनी वटी

जिऱ्याचे चमत्कारी गुण बघा

हा बबलची चर्चा का होते आहे हे लक्षात घ्या. नॅसडॅकमध्ये लिस्टेड असलेल्या NVIDIA या एआयशी संबंधित कंपनीच्या बाजारमूल्याने ५  ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडलेला आहे. हा आकडा किती मोठा आहे, हे समजून घेण्यासाठी भारताचा २०२५ चा अपेक्षित जीडीपी हा ४.२ ट्रिलियन डॉलर असून अमेरिकेचा जीडीपी २०२४ चा जीडीपी २९.१८  ट्रिलियन डॉलर होता. एका कंपनीच्या बाजारमूल्याचे आकडे देशाच्या जीडीपीशी जेव्हा स्पर्धा करतात तेव्हा चर्चा होणे स्वाभाविक आहे.

एआयशी संबंधित अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यांचा नफा किंवा महसूल फारसा नाही, अनेक कंपन्या तोट्यात आहेत. परंतु त्यांचे बाजारमूल्य १ ट्रिलियनच्या जवळपास पोहोचले आहे. नॅसडॅकमध्ये नोंदणी झालेल्या अशा किमान दहा कंपन्या आहेत, ज्यांना तोटा होत असून ज्यांचे बाजारमूल्य १ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळेच बाजारातील बबल अर्थात बुडबुड्याची चर्चा आहेत. या चर्चेला आता खमंग फोडणी मिळालेली आहे.

अमेरिकेतील सायन कॅपिटल या विख्यात हेज फंडचा मालक मायकल बरी याने ३१ ऑक्टोबरला आपल्या एक्स एकाऊंटवरून एक पोस्ट केली. ही पोस्ट बाजारातील त्याच बुडबुड्याची होती. बरी हा काही सामान्य माणूस नाही. बाजाराची नस ज्याला अचूक माहिती आहे, असा जाणकार आहे. मूळचा डॉक्टर असलेला मायकलला शेअर बाजाराची नाडी अचूक ओळखता येते.  युनिवर्सिटी ऑफ वॅण्डरबिल्ट येथून तो १९९७ मध्ये एमडी झाला. परंतु तो औषधांपेक्षा शेअर बाजारात जास्त रमला. २००० मध्ये त्याने सायन कॅपिटल या कंपनीची स्थापना केली. डॉक्टरी पेशा सोडून शेअर बाजाराकडे वळलेला मायकल जिवंतपणी शेअर बाजारातील आख्यायिका बनला आहे. मायकेल ओळखला जातो त्याच्या भाकीतांसाठी. एकदा नव्हे दोनदा तो अचूक ठरला आहे. त्याचे इशारे खरे ठरले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचा त्याच्यावर विश्वास आहे. त्याच्या कंपनीच्या माध्यमातून ज्यांनी गुंतवणूक केली त्यांचे कोटकल्याण झालेले आहे.

यापूर्वी दोनदा त्याने अमेरिकेच्या शेअर बाजारातील बुडबुड्याचे भाकीत केले होते. अमेरिकी शेअर बाजारात २००० मध्ये डॉट कॉम कंपन्यांची लाट आली होती. फक्त नावामागे डॉट क़ॉम जोडले की शेअर धावायला लागायचा. अनेकांनी या या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. अनेक गुंतवणूकदारांचे हात पोळले. भारतात सुद्धा असे अनेक लोक आहेत. नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात याला या डॉटकॉम कंपन्यांचा संशय येऊ लागला. कारम बॅलन्सशीटवर ना महसूल, ना नफा, ना विक्री तरीही या कंपन्यांचे शेअर धावत होते. शेअरच्या किमतीचा आणि कंपन्यांच्या कामगिरीता काहीच संबंध उरलेला नव्हता. घाट्यातील कंपन्यांचे शेअरही उसळत होते. वधारत होते.

मायकेलला हा घोटाळा स्पष्ट दिसत होता. त्याने लोकांना सावधगिरीचा इशारा दिला. हा बुडबुडा फुटणार असे जाहीर भाकीत केले. तेजीची झिंग चढलेल्या लोकांनी पहील्यावेळी त्याला मूर्खात काढले. त्याने मात्र वेळेत शेअर विकून गडगंज पैसा कमावला. दुसऱ्यांदा २००८ मध्ये रिअल इस्टेट मार्केट कोसळून अमेरिकी बाजारात मंदी आली. अमेरिकेत याला सबप्राईम क्रायसिस म्हणून ओळखले जाते. त्यापूर्वीही त्याने याचे भाकीत केले होते. बाजारात रिअल इस्टेट कंपन्यांचे भाव तेजीत असताना याने शेअर फूंकून पैसा कमावला. त्याने योग्य वेळी शेअर विकले होते. कारण पुढे हेच शेअर कवडी दमडीच्या भावात मिळणार हे त्याला ठाऊक होते. त्याच मालकेलने आता एआय बुडबुड्याबाबत जाहीरपणे ढोल बडवायला सुरूवात केलेली आहे. हा बुडबुडा फुटणार असे तो उच्चारवाने सांगतोय. त्याने त्याचा पोर्टफोलिया बऱ्यापैकी रिकामा केला आहे. त्याने भविष्यात एआयचे शेअर कोसळणार असे गृहीत धरून ऑप्शनमध्ये पुट खरेदी केलेले आहेत. म्हणजे फक्त ओरड नाही, तो कृती करून मोकळा झालेला आहे. त्यामुळेच त्यामुळे त्याच्या ताज्या इशाऱ्यामुळे गुंतवणूकदार हादरले आहेत.

Palantir या कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीचे जबरदस्त निकाल ४ नोव्हेंबरला जाहीर झाले. कंपनीच्या नफ्यात वाढ झाली. परंतु मायकेलने एनविडीयासह Palantir च्या शेअरचे सुमारे ९ हजार कोटी रुपयांचे पुट खरेदी केल्यामुळे लोकांमध्ये हडकंप माजला. पुट म्हणजे एखाद्या शेअरचा भाव घसरणार हे लक्षात आल्यामुळे ऑप्शनमध्ये शेअर विकून नफा कमावण्याचे तंत्र. मायकेलच्या आक्रमक विक्रीमुळे Palantir चा शेअर उत्तम निकालानंतरही ९ टक्क्यांनी घसरला.

मायकेल बरीची ही चाल म्हणजे अमेरिकी शेअर बाजारासाठी दुष्काळात तेरावा आहे. कारण या पूर्वी बर्कशायर हॅथवेचा मालक आणि जगप्रसिध्द गुंतवणूकदार वॉरेन बफे गेली आपला पोर्टफोलियो शेअर विकून विकून सतत हलका करतायत. त्याच्याकडे माल विकून आता सुमारे ३८० अब्ज डॉलरची रोख रक्कम जमा झालेली आहे. बफे यांची रणनीती म्हणजे सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी धोक्याचा संकेत आहे. बड्या वित्तिय संस्थांपैकी गोल्डमन सॅक्स आणि मॉर्गन स्टॅन्ले यांनी शेअर बाजारात येत्या वर्षी १० ते २० टक्के घसरणीचा इशारा दिलेला आहे.

बडे गुंतवणूकदार माल विकतायत. रोकड जमा करतायत. छोटे गुंतवणूकदार बाजार आणखी उसळी मारणार म्हणून शेअर विकत घेतायत. त्यामुळे जेव्हा हा बुडबुडा फूटेल तेव्हा कल्हई छोट्या गुंतवणूकदारांची होणार आहे. खरेदीसाठी जेव्हा झुंबड उडालेली असते तेव्हा माल विका आणि जेव्हा बाजारात घबराट माजलेली असते तेव्हा खरेदी करा हे अनेक बड्या गुंतवणूकदारांचे तंत्र आहे.

मायकेल हा पेशाने डॉक्टर आहे. त्याला शेअर बाजाराची नाडी परीक्षा करता येते हे यापूर्वी सिद्ध झालेले आहे. यावेळी त्याचे भाकीत खरे ठरते काय, त्याने जागते रहोचा दिलेला आहे, तो किती लोक मनावर घेतात हे एआयचा बुडबुडा फुटल्या शिवाय कळणार नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
281,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा