29 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
घरसंपादकीयजलेबी-फाफडा विरुद्ध उद्धव ठाकरे बापडा

जलेबी-फाफडा विरुद्ध उद्धव ठाकरे बापडा

ठाकरेंना अदाणींचे खाजगी विमान चालत असले तरी अदाणींना मात्र त्यांचा विरोध आहे

Google News Follow

Related

कितीही थपडा पडल्या तरी शिकायचे नाही, हा उबाठा शिवसेनेचा बाणा असावा. सकाळी ९ चा भोंगा तोंडावर पडला. लोकांनी या भोंग्याच्या ठिकऱ्या केल्या, परंतु ‘गिरे तो भी टांग उपर…’ हे तत्व कायम आहे. विधानसभा निवडणुकीत जातीय
विखार उपयोगी पडला नाही. विधानसभा निवडणुकीत उसळलेली लाट महापालिका निवडणुकीत बुडवणार असे चित्र दिसते आहे, त्यामुळे मराठी विरुद्ध अशी नवी स्क्रीप्ट लिहिण्यात येत आहे. महाराष्ट्रातील गुजराती लॉबीच्या विरोधात उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी एल्गार सुरू केला आहे.

फक्त मुस्लीम मतांच्या आधारावर विधानसभेत दिवे लावता आले नाहीत, महानगर पालिकेतही याची पुनरावृत्ती होणार म्हणून आता गुजराती विरोधाच्या नावावर मराठी मत मिळवण्याचा नवा प्रयोग उबाठा शिवसेनेने सुरू केलेला आहे.
विधानसभा निवडणुकीत मुस्लीमांना डोळा मारण्याची रणनीती उद्धव ठाकरे यांनी कायम ठेवली. लोकसभा निवडणुकीत फळलेली ही रणनीती विधानसभा निवडणुकीतही फळेल असे त्यांना वाटले होते. परंतु तसे काही घडले नाही. मुस्लीम मते मिळाली, परंतु पराभव टाळता आला नाही. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मतांमुळे विजय मिळाला कारण, मुस्लीम मतांसोबत जातीय विखाराचा तडकाही लावण्यात आला होता.

ठाकरेंच्या दुर्दैवाने विधानसभा निवडणुकीत जातीय विखार संपवण्यासाठी रा.स्व.संघ मैदानात उतरला आणि यशस्वी ठरला. त्यामुळे उबाठा सोबत उरला फक्त मुस्लीम आणि उद्धव ठाकरेंच्या मुक्ताफळांवर विश्वास ठेवणारा मतदार. विजयासाठी एवढे पुरेसे ठरले नाही. उबाठा शिवसेनेच्या नेत्यांच्या हे लक्षात आले आहे. मस्लीम मतांसोबत गुजराती विरोध जोडण्याचा प्रयत्न त्यातूनच सुरू झाला आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मराठी विरुद्ध गुजराती अशी पेटवापेटवी होणार हे निश्चित. संजय राऊत यांनी त्याचे संकेत दिले आहे.

‘गुजराती लॉबीमुळे महायुतीचा विजय झाला आहे, त्यामुळे महायुतीचा शपथविधी शिवतीर्थावर न करत गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर करा’, असा फुकटचा सल्ला राऊतांनी दिलेला आहे. या विधानातून उबाठा शिवसेनेची मुस्लीम मतांना गुजरात विरोधाचा तडका देण्याची रणनीती उघड झालेली आहे. गुजरातचा विरोध करताना जे अंबांनीच्या विवाह सोहळ्यात बॉलिवूडच्या गाण्यांवर का थिरकले? याच विवाह सोहळ्यानिमित्त ठाकरेंनी सहकुटुंब क्रुझ पार्ट्यांचा आनंद का घेतला? महापालिकेत सत्तेवर असताना त्यांनी फक्त गुजराती लॉबीला कंत्राटे का दिले? आदित्य ठाकरेंनी गेल्या वेळी निवडणूक लढवताना ‘केम छो वरळी…’ हा नारा का दिला? जलेबी फाफडा, उद्धव ठाकरे आपडा ही घोषणा उबाठालावाले का देतात? असे प्रश्न कुणाच्या डोक्यात असतील तर ते त्यांनी तात्काळ झटकून टाकावे. लाजलज्जा असलेले नेते अशा किरकोळ गोष्टींचा विचार करतात. जे अंबानींच्या विवाह सोहळ्याच्या प्रत्येक पार्टीत मिरवतात, त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या
कार्यकाळातच एंटालियाखाली स्फोटके पेरण्यात आली होती, याचा विसर पडू देऊ नका. ठाकरे याबाबत प्रचंड स्थितप्रज्ञ आहेत.

हे ही वाचा:

संभलमधील जामा मशिदीबाबत ‘बाबरनामा’ काय म्हणतो?

म्हणे पराभवाला माजी सरन्यायाधीश जबाबदार

भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई, अंदमानमध्ये ५ टन ड्रग्ज जप्त!

सेन्सेक्स १२०० अंकांनी वधारला

जरांगेंसारखे मनोरुग्ण जसे इतर जातींचा द्वेष करतात तशी बरीच माणसे समाजात वावरत असतात. कुणाच्या तरी विरोधात बोलले तर त्यांना त्यात सुख वाटते. काहींना गुजरात्यांविरोधात बोललेले आवडते, काहींना उत्तर भारतीयांच्या विरोधात बोलेले आवडते, काहींना मोदींच्या विरोधात बोलेले आवडते. अशांना तापवायचे, मुस्लिम मतांमध्ये या मतांची गोळाबेरीज करून ठाकरेंचे तारु तरेल असा प्रयत्न करायचा. त्यामुळे उबाठा शिवसेनेकडून येत्या काळात मराठी विरुद्ध गुजराती अशी
वातावरण निर्मिती निश्चितपणे होणार. त्यासाठी उद्योगपती गौतम अदाणी यांचे नाव वापरले जाणार. ठाकरेंना अदाणींचे खाजगी विमान चालत असले तरी अदाणींना मात्र त्यांचा विरोध आहे बरं का.

गुजरात ल़ॉबी हा शब्द राऊतांनी जाणीवपूर्वक वापरला आहे. आम्ही गुजराती लॉबीच्या विरोधात आहोत, गुजरात्यांच्या नाही, असा युक्तिवाद कऱणे त्यामुळे सोयीचे ठरणार आहे. मतांसाठी गुजराती वस्त्यांमध्ये जायचा मार्गही मोकळा राहणार आहे. मुंबईत गुजराती मतांचा टक्का बऱ्यापैकी आहे. जलेबी फाफडा, उद्धव ठाकरे आपडा अशा घोषणा द्यायच्या असतील तर गुजरात्यांना उघडपणे टार्गेट करता येणार नाही. आम्ही गुजरात्यांच्या विरोधात नाही. गुजराती लॉबीच्या विरोधात आहोत,
असे मखलाशी करता आली पाहिजे, म्हणून लॉबी हा शब्द वापरता आला पाहिजे. ठाकरेंच्या रणनीती म्हणजे संजय राऊतांनी सांगितलेल्या कानगोष्टी. अडीच वर्षांची सत्ता वगळता, त्यामुळे आजवर फरफटच झाली हे उद्धव ठाकरेंच्या
अजून लक्षात येत नाही. झालेली फरफट पुरेशी वाटत नसल्यामुळे संजय राऊतांच्या नव्या रणनीती मागे घसरत जाण्याचा निर्धार ठाकरेंनी केलेला दिसतोय.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
207,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा