25 C
Mumbai
Saturday, December 7, 2024
घरसंपादकीयश्रद्धा निर्मूलन ते भाजपा निर्मूलन; एक मानवी प्रवास

श्रद्धा निर्मूलन ते भाजपा निर्मूलन; एक मानवी प्रवास

काँग्रेसच्या प्रचारासाठी मानव सरसावले

Google News Follow

Related

आयुष्यभर अंदश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली सुरू असलेले श्रद्धा निर्मूलनाचे दुकान आता बंद पडायची वेळ आलेली आहे. कारण हिंदू जागृत झालेला आहे. त्यामुळे दुसऱे दुकान सुरू करणे भाग आहे, याची जाणीव बहुधा श्याम मानव यांना झालेली आहे. सध्या त्यांनी स्वत:ला काँग्रेसच्या दावणीला बांधून घेतलेले आहे. ज्या काँग्रेस पक्षाने देशावर आणीबाणी लादून देशातील लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केला, त्या काँग्रेस पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी मानव सध्या त्यांचे सल्लागार, प्रवक्ते, मार्गदर्शक बनले आहे.

अनेक दशके वाटचाल करून सुद्धा अंधश्रद्धा निर्मुलन समिती ही महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी अंधश्रद्धा ठरली. भारतात हिंदू धर्माला कोणी शिव्या घालायला सुरूवात केली की त्यांना लगेच विदेशातून पैसे यायला सुरूवात होते. त्यामुळे अशी दुकाने अनेकांनी थाटली. या समितीचे वैशिष्ट्य़ असे की यांनी फक्त हिंदूंच्या श्रद्धेवर हातोडा चालवण्याचे काम केले.

हे ही वाचा:

राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची हत्या एसआरएच्या वादातूनच ?

सिद्धरामय्यांनी आता राजीनामा द्यावा

‘व्होट जिहाद’ची चौकशी करा अन भाजपच्या पराभवासाठी मशिदीतून निघालेले फतवे जगासमोर आणा!

नऊ बलुच विद्यार्थ्यांचे पाक अधिकाऱ्यांनी केले अपहरण

बराच काळ मानव नव्या दुकानाच्या शोधात होते. लोकसभा निवडणुकीच्या काळातही त्यांना काँग्रेसची प्रवक्तेगिरी करण्याची सुरूसुरी आली होती. परंतु त्यांना थोडी उशीराच जाग आली. तोपर्यंत सरोदे आणि चौधरींनी टेंडर पटकावला होता. यावेळी ते मैदानात नाहीत असे पाहून मानव यांनी आपले दुकान उघडले. संविधान वाचवण्यासाठी सभा घेण्याची जबाबदारी सध्या त्यांनी खांद्यावर घेतलेली आहे.

नागपूरमध्ये धंद्याची भवानी होत असताना भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अपशकून केला. जोरदार घोषणाबाजी केली. मनात वाईट हेतू घेऊन काम केले की नियती असेच काही तरी घडवून आणते. मानव हे पुरोगामी असल्यामुळे त्यांचा नियतीवर विश्वास असण्याचे कारण नाही. परंतु ते मुर्खांच्या नंदनवनात वावरतायत, म्हणून जगानेही वावरावे असा काही नियम नाही.

अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा पुरेपुर वापर करीत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळेच संविधान वाचवण्याची गरज अधोरेखित होते, अशी जळजळीत प्रतिक्रिया मानव यांनी व्यक्त केली. खरे तर त्यांनी या घोषणाबाजीवर आक्षेप घेण्याचे कारण नाही. कारण मानव ज्या काँग्रेसच्या पालख्या खांद्यावर नाचवतायत, त्या काँग्रेसचे ५५ वर्षांचे युवा नेते आणि त्यांची टोळी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू झाले की हेच करत असतात. जर ते संविधानाचे संरक्षक आहेत, तर मग भाजयुमोचे कार्यकर्तेही तेच करत नव्हते का? देशाचे पंतप्रधान संसदेत भाषण करत असताना त्यांना घोषणाबाजी करून रोखणे हीच जर काँग्रेसची लोकशाही असेल तर मग भाजयुमोचे कार्यकर्ते संविधान वाचवण्यासाठीच मानव यांच्या विरोधात घोषणाबाजी करत होते असे मानायला काय हरकत आहे.

जनतेची जबरदस्तीने नसबंदी करणारे संजय गांधी, त्यांना आणीबाणी लादून ते स्वातंत्र्य देणाऱ्या इंदीरा गांधी, दिल्लीत झालेल्या शिखांच्या हत्याकांडाचे निर्लज्ज समर्थन करणारे राजीव गांधी, संविधानाच्या चौकटीत बसत नसताना देशात निवडणुका लढवून जिंकून येणाऱ्या सोनिया गांधी, दोन देशाचे नागरीकत्व घेऊनही देशाच्या संसदेत पोहोचलेले राहुल गांधी ही काँग्रेसची लोकशाही आणि संविधान बचाव आंदोलन आहे.

श्याम मानव यांच्यासारखे बैल त्या काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी आणि भाजपाला हाणण्यासाठी, भाजपाचा संविधान मोडीत काढायला निघालेले आहे, असा खोटा प्रचार करण्यासाठी संविधान बचाव सभा घेत आहेत. अशा दलालांच्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन केले तर मानव यांच्या बुडाला बुडबुडे येण्याचे कारण काय? तुम्हाला खोटे बोलण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे काय? जनतेला मूर्ख बनवणे हे तुमचे संविधान बचाव असेल तर या खोटेपणाच्या विरोधात उभे ठाकणे ही भाजपा कार्यकर्त्यांची जबाबदारी बनते.

मानव यांचे हे खोटेपणाचे धंदे नवे नाहीत. अनेक दशके ते खोट्याचा बाजार भरून आपले उदरभरण करीत आहेत. हिंदू धर्माच्या विरोधात सुपारी घेऊन आंदोलने करणारे, हिंदू श्रद्धांचा अपमान करणारे मानव यांचे कारनामे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहेत. हे सुपारीबाज आहे. आधी चर्चकडून सुपारी घेत होते आता काँग्रेसकडून घेतायत एवढाच फऱक.

पादऱ्यांच्या चंगाई सभांमधून पवित्र पाणी शिंपडून कँसर सारखे असाध्य रोग बऱे करण्याचे दावे, किंवा मौलवींचे चाळे यांना कधी खटकले नाहीत. त्यांच्या विरोधात यांनी आंदोलन केले नाही. हिंदू म्हणजे मुके बिचारे कुणीही हाका अशी परिस्थिती त्यामुळे त्यांच्याविरोधात काहीही बोला. देवादिकांना दूषणे द्या काहीही होत नाही, असा अनुभव असल्यामुळे एकेकाळी ही दुकानदारी जोरात होती. परंतु आता हिंदू जागा झाला आहे.

देवदेवतांना शिव्या घातल्या की महाराव होतो. याची जाणीव आता मानव यांच्यासारख्यांना झालेली आहे. पादऱ्यांना धर्मप्रचारासाठी सोयीचे होते म्हणून हिंदू श्रद्धांना लाखोली पाहीली की फटके पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे मानव सध्या संविधान वाचवायला सरसावलेले आहेत. परंतु ही राजकीय भडवेगिरी आहे, याची जाणीव असलेले त्यांचा विरोध करणार. संविधानाने अभिव्यक्तिचे स्वातंत्र्य काय फक्त खोटे बोलणाऱ्यांनाच दिलेले आहे काय? ते भाजपाच्या कार्यकर्त्यांनाही आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
209,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा