26 C
Mumbai
Tuesday, March 28, 2023
घरसंपादकीयकौटुंबिक लोकशाही चिरायू होवो...

कौटुंबिक लोकशाही चिरायू होवो…

वडील एका पक्षात आणि मुलगा दुसऱ्या पक्षात याला लोक राजकारण म्हणू दे, आमच्या दृष्टीने ही कुटुंबातील लोकशाही आहे.

Google News Follow

Related

शिउबाठाचे नेते, ठाकरेंचे निष्ठावान, माजी मंत्री सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. सुभाष देसाई यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते. चिरंजीवांच्या पक्ष बदलामुळे क्लेश झाल्याची प्रतिक्रिया सुभाष देसाई यांनी दिलेली आहे. परंतु हा क्लेश त्यांच्यासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

पिता एकीकडे आणि पुत्र एकीकडे हे समीकरण उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात दुसऱ्यांदा जुळताना दिसते आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महीन्यात शिउबाठाचे खासदार, जेष्ठ नेते गजानन कीर्तिकर एका जाहीर कार्यक्रमात वाजत गाजत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सामील झाले. परंतु त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांनी मात्र ठाकरेंच्या सोबत राहणे पसंत केले. आपण वडिलांना शिंदेंसोबत जाण्यापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु ते ऐकले नाहीत. त्यांनी पक्ष सोडला असला तरी मी मात्र ठाकरेंच्यासोबत राहणार असल्याचे अमोल यांनी सांगितले आहे. अमोल हे शिउबाठाचे उपनेते आहेत. तिथे अमोल यांनी पित्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता. देसाईंच्या प्रकरणात वडील मुलाला समजवण्याचा प्रयत्न करत होते.

वडील एका पक्षात आणि मुलगा दुसऱ्या पक्षात याला लोक राजकारण म्हणू दे, आमच्या दृष्टीने ही कुटुंबातील लोकशाही आहे. प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार. त्या अधिकाराचा दुसऱ्या सदस्याकडून केला जाणारा आदर. भूषण देसाई यांचे शिवसेनेत जाणे हा ठाकरे गटाला मोठा झटका मानला जातो. भूषण हे पक्षात फार सक्रीय होते, त्यांच्या पाठीशी खूप कार्यकर्ते आहेत किंवा त्यांचे फार मोठे काम आहे, अशातला भाग नाही. परंतु सुभाष देसाई आणि ठाकरे हे गेल्या किमान पाच दशकांचे समीकरण आहे.

हे ही वाचा:

काही आमदार परत येतील म्हणूनच १६ आमदारांना नोटीस दिली

उद्धव ठाकरे कुटुंबियांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

काय आहे लाईफ ऑफ ‘पाय’?

म्यानमारमध्ये बौद्ध भिक्षुंना घातल्या गोळ्या

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान असलेल्या सुभाष देसाई यांनी आपल्या निष्ठा उद्धव आणि आदित्य यांच्या चरणी वाहिल्या. छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे असे तालेवार नेते पक्षातून बाहेर जात असताना सुभाष देसाई हे ठामपणे ठाकरेंच्या सोबत उभे होते. ते पक्ष सोडून कुठे जातील अशी चर्चाही कधी झाली नाही, एवढ्या त्यांच्या निष्ठा अढळ होत्या.

देसाई हे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्योग मंत्री होते. या काळात एमआयडीसीची ४.१४ लाख चौ.मी. जमीन निवासी जागेत बदलण्यात आली. हा सुमारे तीन हजार कोटींचा घोटाळा असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. आरोपात तथ्य असले तर उद्योगमंत्री म्हणून त्याची जबाबदारी देसाई यांना टाळता आली नसती. सरकार असताना केलेले घोटाळे हे विरोधी बाकांवर असताना अंगाशी येतात. देसाईंच्या बाबतीत तेच होणार होते.

भूषण देसाई या घोटाळ्यात किती अडचणीत आले असते हा नंतरचा विषय होता. सुभाष देसाई यांना मात्र मंत्री म्हणून ही जबाबदारी टाळता आली नसती. भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पत्रकारांनी त्यांना नेमका हाच पहिला प्रश्न विचारला. कुणाला वॉशिंग मशीनमध्ये जायचे असेल तर जाऊ दे ही आदित्य ठाकरे यांची देसाई यांच्या पक्षप्रवेशानंतर दिलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. शिवसेनेत प्रवेश करण्याबाबतची भूमिका एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यानंतरच घेतली होती, असे भूषण देसाई यांनी स्पष्ट केले आहे. ही भूमिका त्यांनी वडिलांच्या कानावरही घातली होती. परंतु प्रत्यक्षात पक्ष प्रवेश करण्यासाठी त्यांनी सात महीन्यांचा वेळ घेतला.

मुलगा शिवसेनेत गेल्यानंतर पक्षाला काही फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया सुभाष देसाईंनी व्यक्त केलेली आहे. पक्षाला फरक पडला नसला तरी भूषण यांचा पक्ष बदल सुभाष देसाई यांच्या मात्र पथ्यावर पडणार आहे. कदाचित त्यांच्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप थंड्या बस्त्यात टाकण्यात येतील. त्यामुळे भूषण देसाई यांचा शिवसेनेला प्रवेश हा सुभाष देसाई यांच्या समंतीने झाला असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. भूषण देसाई हे तिथे गेले की सुभाष देसाई यांनीच त्यांना तिथे पाठवले, अशी चर्चा काही जण दबक्या आवाजात करतायत, त्याचे कारण ही हेच आहे.

भवितव्य असलेल्या पक्षात गेल्यामुळे भूषण देसाई यांचा भविष्य काळ सुरक्षित झाला. ठाकरेंच्या सोबत राहिल्यामुळे सुभाष देसाई यांच्या निष्ठेचेही कौतुक झाले. मुलगा सत्ताधारी पक्षात असल्यामुळे सुभाष देसाई यांच्यावर कारवाईची शक्यता बरीच कमी झाली आहे. भूषण देसाई यांच्या शिवसेना प्रवेशाने एका दगडात असे अनेक पक्षी टिपले गेले आहेत. हिंदीतील एक म्हण या विषयावर एकदम फिट बसते, चित भी मेरी और पट भी मेरी अंटा मेरे बाप का.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,876चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
65,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा