29.7 C
Mumbai
Thursday, June 4, 2026
घरसंपादकीयउबाठा शिवसेना पश्चात्ताप करेल का?

उबाठा शिवसेना पश्चात्ताप करेल का?

Google News Follow

Related

उबाठा शिवसेना या पक्षाचे आमदार अंबादास दानवे जे याआधी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते सुद्धा होते त्यांनी मध्यंतरीच एक खळबळजनक विधान केलं. अंबादास दानवे म्हणाले की,  उबाठा शिवसेना हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष आणि एकनाथ शिंदेची ओरिजनल शिवसेना हे पक्ष एकत्र यायला पाहिजेत. अर्थात,  ज्यांना वाटलं पाहिजे त्यांना जर ते वाटलं तरच ते शक्य होऊ शकतं. पण तूर्तास आपल्याला मात्र वाटतय की, या दोन पक्षांनी एकत्र यायला पाहिजे. अशा पद्धतीचे विधान या आधी कधीच कोणी केलेल नव्हतं. प्रामुख्याने अन्य पक्ष किंवा कोणी कार्यकर्ते वगैरे बोलत सुद्धा असतील पण उबाठा शिवसेना पक्षातील एक आमदार आणि अंबादास दानवे यांनी हे विधान केले त्याला महत्त्व आहे. दानवे हे सर्वसामान्य असे आमदार नाहीयेत ते विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते होते. आत्ता जी एक आमदारकीची निवडणूक होती त्यासाठी नाव जाहीर करताना अंबादास दानवे यांचे नाव पुढे आले. याचा अर्थ ते एक प्रमुख नेते आहेत उबाठा शिवसेनेतले. २०२२ पासून उबाठा शिवसेनेकडून प्रचंड प्रमाणात शिंदेवर चिखलफेक होती, त्याला उत्तर दिलं गेलं पण  कधी उद्धव ठाकरेंवर वैयक्तिक टीका शिंदे यांनी केली नाही,  कधी भाषेचा स्तर खाली घसरू दिला नाही. उबाठा शिवसेनेने तो स्तर इतका खाली आणला होता की त्यांनी कोणकोणत्या शब्दांचा वापर केला गेला हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्यामुळे या दोन पक्षांमध्ये मोठं अंतर पडलेलं आहे, मोठा तडा गेलेला आहे. तळा म्हणजे ते दोन्ही पक्ष जेव्हा एकत्र होते तेव्हा ठीक होतं. अशा वेळेला दोन पक्ष एकत्र यावेत असं जेव्हा अंबादास दानवेंना वाटतं त्यावेळेला त्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त होतं. खरोखरच फक्त अंबादास दानवेनाच वाटतय का की उबाठा गटामध्येच वरिष्ठांनाही असं वाटायला लागलेल आहे?  हे कळायला मार्ग नाही.

त्यावर संजय राऊत यांना जेव्हा पत्रकारांनी विचारलं तेव्हा ते म्हणाले की एकनाथ शिंदे आणि हे दोन पक्ष एकत्र यायचे असतील तर एकनाथ शिंदेनी मातोश्रीवर यावं आणि पश्चाताप व्यक्त करावा, तरच ते होऊ शकतं. मग आपल्याला काहीतरी पुढे बोलता येईल.  आता यावर विश्लेषण करायचं झालं तर मुळात एकनाथ शिंदेच्या पक्षाला पश्चाताप व्यक्त करण्याची आवश्यकता नाही आणि त्यासाठी मातोश्रीवर जाण्याची स्वतः उद्धव ठाकरेना भेटण्याची याची अजिबातच गरज नाही.

एकनाथ शिंदे ज्यावेळेला वेगळे झाले, २०२२ ला ते मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर ज्या निवडणुका पुढच्या आलेल्या आहेत मग लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल महापालिकेच्या निवडणुका, नगरपालिका जिल्हा परिषदांच्या निवडणुका या सगळ्या निवडणुकात एकनाथ शिंदेच्या पक्षाना प्रचंड अपयश पदरी पडलं असतं त्याचा सामना करावा लागला असता तर लोक म्हणाले सुद्धा असते की, एकनाथ शिंदे यांनी वेगळ होऊन काय नेमकं साध्य केलं?  किती आमदार निवडून आणले?  किती नगरसेवक निवडून आणले? पण तसं काहीच झालं नाही उलट एकनाथ शिंदेनी ४० आमदारांसह बाहेर पडून चांगलं यश मिळवून दाखवलं. विधानसभेमध्ये चांगलं यश मिळवलं ५७ आमदार त्यांचे आहेत. आता त्यानंतर बाकीच्या महानगरपालिका, नगरपालिका या सगळ्या निवडणुका त्यांनी पूर्ण जोर लावून लढवल्या. भाजपा सोबत एकनाथ शिंदे सुद्धा आपल्याला सगळीकडे फिरताना दिसले वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी प्रचार केला. फक्त मुंबई ठाणे याच पुरत त्यांचं प्रचार होता असे नाही. त्याचं त्यांना फळ सुद्धा मिळालं. त्यामुळे एकनाथ शिंदे यशस्वी झाले याचा अर्थ लोकांनी काढला की, एकनाथ शिंदे यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलेल आहे वेगळं होऊन ते कमी पडले नाहीत.

हे ही वाचा:

रोहित-विराटसोबत खेळण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं

विप्रो’मध्येही ‘कॉर्पोरेट जिहाद’! हिंदू महिला कर्मचाऱ्याला कंपनीतून काढले

कुवेत विमानतळावर झालेल्या इराणच्या हल्ल्यात भारतीय नागरिक ठार

रणवीर सिंहला मोठा दिलासा! चित्रपट संघटनेकडून बंदी मागे

एकनाथ शिंदेनी स्वतःही सिद्ध करून दाखवलं की, आपण पक्षाचे नेेेते आहोत आणि आपल्या नेतृत्वाखाली हे सगळे आमदार आलेले आहेत ते पुन्हा निवडून येऊ शकतात,  आणखी जास्त संख्येने निवडून येऊ शकतात. खासदारही आपण निवडून आणू शकतो. आपण नगरसेवक निवडून आणू शकतो. विविध जिल्ह्यातल्या पालिकांमध्ये आपली ताकद दाखवू शकतो. नगरपालिकांमध्ये ताकद दाखवू शकतो हे त्यांनी सिद्ध केलं. त्यामुळे आता एकनाथ शिंदेना काय गरज आहे पश्चाताप व्यक्त करण्यासाठी मातोश्रीवर जाण्याची?

मग अशा वेळेला प्रश्न येतो की पश्चात्ताप व्यक्त कोणी करायचा?  शिंदे यांच्या सोबत असलेल्या आमदारांनी वेगळे होताना सांगितलं की, आम्हाला मातोश्रीचे दरवाजे आमच्यासाठी उघडे नव्हते, उद्धव ठाकरेना आम्ही भेटू शकत नव्हतो… जर कोणाला मागे पाऊल घ्यायचं असेल तर ते उद्धव ठाकरे यांच्या पक्षालाच घ्याव लागेल. आता ते घेतील की नाही माहिती नाही. पण आगामी काळात काय परिस्थिती निर्माण होईल हे आपण आता काहीच सांगू शकत नाही.

आता जर काही मागे पाऊल घ्यायचे तर उद्धव ठाकरे यांनाच घ्यावे लागेल त्याला आपण पश्चाताप व्यक्त करणे  असं एकवेळ म्हणूया नको,  पण बॅकफुटवर जायचं झालं तर ते उद्धव ठाकरेंना जावं लागेल.

पण ते जातील का माहिती नाही. कारण शेवटी ते पक्षाचे प्रमुख आहेत. एकनाथ शिंदे हे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते त्यामुळे ते बॅकफुटवर जातील याची शक्यता नाही. असं जर असेल ते दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकत नाहीत पण आगामी काळात जर आपल्याला एक अंदाज व्यक्त करायचा असेल की असं झालं तर उद्धव ठाकरेंनाच बॅकफूटवर जावं लागेल, एक पाऊल मागे जाताना एकनाथ शिंदेशी बोलून त्यांना निर्णय घ्यावा लागेल.  एकत्र यायचं झालं तर पक्षाचे नेतृत्व एकनाथ शिंदे काय पुन्हा उद्धव ठाकरेकडे सोपवणार नाहीत. त्यामुळे उद्या उद्धव ठाकरे वेगळे राहून मार्गदर्शन करू शकतात, पण पक्ष जो आहे तो एकनाथ शिंदेच्याच नेतृत्वाखाली काम करेल असंच म्हणता येऊ शकतं.

अर्थात हे खूप पुढचे अंदाज आहेत राजकारणात काही होऊ शकतं. पण सध्या तरी एकनाथ शिंदे पश्चाताप व्यक्त करण्याची अजिबात शक्यता नाही. आता आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीने या विधानसभा निवड निवडणुकीमध्ये १३२ आमदार जिंकून आणले आणि एकूण महायुतीचे जवळपास २३५ आमदार आहेत. अशा परिस्थितीमध्ये भाजपा सोबत जाण्याची शक्यता नाही उद्धव ठाकरे प्रयत्न करत असतील, कदाचित ते पुन्हा एकदा सगळं जुळून येईल असे प्रयत्न करत असतीलही पण भाजपाला आता त्यांची गरज राहिलेली नाही हे सिद्ध झाले आहे. लोकांनीही ते दाखवून दिले की, तुम्हाला आता उद्धव ठाकरेंची गरज नाही जशी ती २०१९ पर्यंत होती, २०१४ ला सुद्धा होती. ज्या पद्धतीने भाजपाचा अपमान केलेला आहे, एकनाथ शिंदेचा अपमान केला आहे ते पाहता उद्धव ठाकरेंना परतीचे दोर पूर्णपणे कापले गेलेत, असंच म्हणता येऊ शकतं.

तरी देखील अंबादास दानवे हे जे काही विधान करता आहेत त्याची जर शक्यता लक्षात घेतली तरी एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर जाणार नाहीत. एकनाथ शिंदेकडे उद्धव ठाकरे गेले तर काहीतरी होण्याची शक्यता आहे.

उबाठा शिवसेना पक्षाचे नेते म्हणून उद्धव ठाकरे यांनी स्वतःच आता आमदारकी स्वीकारली नाही त्यांची आमदारकीची मुदत संपल्यानंतर त्यांना जर खरोखरच ऍक्टिव्ह राहायचं असतं राजकारणात तर त्यांनी पुन्हा आमदारकी घेतली असती, पुन्हा एकदा ते विधान परिषदेमध्ये गेले असते. पण तसं झालं नाही याचा अर्थ हळूहळू ते त्याच्यापासून बाहेर पडलेले आहेत.  अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे याांचे  पारडे उद्धव याांच्यापेक्षा जडच आहे. त्यांच्याकडे ५७ आमदार आहेत, तिथे उबाठा पक्षाकडे २० आमदार आहेत. त्यामुळे पश्चाताप जर करायचा असेल, जर एक पाऊल मागे जायचं असेल तर ते उबाठा पक्षालाच टाकावं लागेल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
311,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा