29 C
Mumbai
Thursday, September 24, 2026
घरदेश दुनिया‘इक्वल अर्थ’ नकाशाला १६४ देशांचा पाठिंबा

‘इक्वल अर्थ’ नकाशाला १६४ देशांचा पाठिंबा

१५० वर्षांहून जुना नकाशा बदलणार?

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

आपण लहानपणापासून जगाचा जो नकाशा पाहत आलो आहोत, तो आता बदलण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत जगाचा नकाशा अधिक अचूक पद्धतीने दाखवण्याच्या प्रस्तावाला तब्बल १६४ देशांनी पाठिंबा दिला आहे. या प्रस्तावानुसार, आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा ‘मर्केटर’ नकाशा बदलून ‘इक्वल अर्थ’ नकाशाचा वापर वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेष म्हणजे अमेरिकेने या प्रस्तावाला विरोध केला आहे.

यामागचं कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे. पृथ्वी गोल आहे, पण तिचा नकाशा आपल्याला सपाट कागदावर पाहावा लागतो. त्यामुळे नकाशा तयार करताना काही देश आणि खंड त्यांच्या खऱ्या आकारापेक्षा मोठे किंवा लहान दिसतात. मर्केटर नकाशात उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या जवळचे भाग मोठे दिसतात. त्यामुळे युरोप, उत्तर अमेरिका आणि रशिया प्रत्यक्षापेक्षा मोठे दिसतात, तर आफ्रिका तुलनेने लहान दिसतो. उदाहरण द्यायचं झालं तर नकाशावर ग्रीनलँड आणि आफ्रिका जवळपास सारखे दिसतात; पण प्रत्यक्षात आफ्रिका ग्रीनलँडपेक्षा तब्बल १४ पट मोठा आहे.
हे ही वाचा:
शिक्षकदिनी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी पंतप्रधानांची मनमोकळी ‘बात’

२७ नोव्हेंबर ‘बालविवाह विरोधी दिवस’ म्हणून घोषित!

जम्मू- काश्मीरमधील बडगाममध्ये लष्करच्या कमांडरचा खात्मा

सुभाष चंद्राविरोधात सीबीआयची एफआयआर दाखल

‘इक्वल अर्थ’ नकाशाची खासियत म्हणजे यात खंडांचा आकार त्यांच्या प्रत्यक्ष क्षेत्रफळाच्या जवळपास योग्य प्रमाणात दाखवला जातो. त्यामुळे या नकाशात आफ्रिका मोठा दिसेल, तर युरोप आणि उत्तर अमेरिका तुलनेने लहान दिसतील. यामुळे जगातील देश आणि खंडांचा खरा आकार लोकांना अधिक स्पष्टपणे समजू शकतो. विशेषतः आफ्रिकेचा खरा विस्तार या नकाशामुळे ठळकपणे समोर येणार आहे.

मात्र याचा अर्थ असा नाही की उद्यापासून जगातील सर्व नकाशे बदलणार आहेत. संयुक्त राष्ट्रांचा हा निर्णय बंधनकारक नाही. त्यामुळे मर्केटर नकाशावर बंदी आलेली नाही. शाळा, कंपन्या किंवा सरकारांना लगेच नकाशे बदलण्याची सक्तीही नाही. अमेरिकेने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असून, संयुक्त राष्ट्रांनी नकाशाऐवजी जगातील इतर गंभीर प्रश्नांवर लक्ष द्यावं, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे नकाशा बदलण्याची प्रक्रिया लगेच होणार नसली, तरी भविष्यात आपण जगाकडे पाहतो ते चित्र नक्कीच बदलू शकतं. जग बदलणार नाही; पण जगाचा नकाशा मात्र नव्या रूपात दिसू शकतो.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा