35 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरअर्थजगतविदेशातही अटर्ली, बटर्ली डीलिशस अमुलचा झेंडा

विदेशातही अटर्ली, बटर्ली डीलिशस अमुलचा झेंडा

Google News Follow

Related

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ५५% अधिक निर्यात

कोरोना महामारीचा फटका अन्न उत्पादनांसह सर्व उद्योगधंद्यांना बसला होता. अशा परीस्थितीतही अमुलने एप्रिल-नोव्हेंबर २०२० या काळात अडीचशे कोटींची निर्यात नोंदवली होती. या निर्यातीत गेल्यावर्षीच्या तुलनेत ५५ टक्क्यांची घसघशीत वाढ झाली आहे.

हे ही वाचा: अमूल लवकरच करणार विस्तार 

भारतभर दूध व दुग्धजन्य पदार्थांसाठी ‘अमुल’ अतिशय विश्वसनीय ब्रँड आहे. त्याचबरोबर देश-विदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांमुळे अमेरिका, पश्चिम आशिया आणि सिंगापूर या देशांतून अमुलच्या उत्पादनांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ‘गुजरात सहकारी दूध वितरण संघ लिमिटेड’ (जी.सी.एम.एम.एफ)चे व्यवस्थापकिय संचालक आर.एस सोढी यांनी बिझनेस लाईन वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की या आर्थिक वर्षी एकंदरीतच निर्यात १७% जास्त राहिली आहे. अमुलच्या मागणीत वाढ होऊन अधिक निर्यात झालेल्या दुग्धजन्य पदार्थांत तूप, चीज, बटर इत्यादी पदार्थांचा समावेश होतो. एका बाजूला अमूलच्या उत्पादनांची मागणी वाढली असली तरीही दूधाच्या पावडरीची निर्यात ६०% घटल्याचे चित्र दिसत आहे.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा