अमेरिकेच्या टेक्सासमध्ये मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या नदीच्या पुरामुळे २४ जणांचा मृत्यू झाला. याशिवाय उन्हाळी शिबिरात सहभागी झालेल्या २० हून अधिक मुली बेपत्ता झाल्या आहेत.
वेगाने वाहणाऱ्या नदीमुळे आजूबाजूच्या जंगले, कॅम्पग्राउंड्स आणि वस्ती असलेल्या भागांना धोका निर्माण झाला आहे. मदत आणि बचाव पथकांनी बोटी आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले आहे.
BREAKING: 20 children are missing in the Texas Hill Country flash flood.
Praying for the best.
This is not a time to be defunding weather research and NOAA. pic.twitter.com/VpUpnAylKk
— Brian Krassenstein (@krassenstein) July 4, 2025
अमेरिकेच्या हवामान विभागाने टेक्सास हिल कंट्रीमधील केर काउंटीच्या काही भागांमध्ये वादळामुळे मुसळधार पाऊस पडल्यानंतर अचानक पूर आणीबाणी जाहीर केली आहे. केरव्हिल, काउंटी सीटचे शहर व्यवस्थापक डाल्टन राईस यांनी सांगितले की, पहाटेच्या आधी मोठा पूर आला होता आणि कोणताही इशारा देण्यात आला नव्हता.
मुसळधार पावसामुळे ग्वाडालुपे नदीची पाण्याची पातळी ४५ मिनिटांत २६ फूट वाढली आहे. १४ हेलिकॉप्टर आणि ड्रोन शोध क्षेत्रावरून उडवले जात आहेत आणि बेपत्ता नागरिकांचा शोध घेतला जात आहे.
Ever seen a wall of water come crashing down a river?
This is the timelapse footage of the Llano River on July 4th at 5:10pm.
This is a naturally occurring flash flood.
Mother nature is real.
pic.twitter.com/7kIf7amSdq— Tom Slocum for Texas 🇺🇸 (@slocumfortexas) July 5, 2025
याशिवाय त्यांनी परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आणि पुढील २४ ते ४८ तासांत सॅन अँटोनियो ते वाकोपर्यंत पूर येण्याचा धोका असल्याचे सांगितले आहे.
