28.3 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरदेश दुनियासूर्यनगरी एक्सप्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले

सूर्यनगरी एक्सप्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले

प्रवासी झोपेत असताना अपघात,१० जखमी

Google News Follow

Related

बांद्रा टर्मिनस वरून जोधपुर ला जात असलेल्या सूर्यनगरी एक्सप्रेस गाडीला भीषण अपघात झाला आहे गाडीतील सर्व प्रवासी साखर झोपेत असताना पहाटे साडेतीन वाजता या गाडीचे आठ डबे रुळावरनं घसरले तर दोन डबे पलटी झालेले आहेत .या अपघातात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अपघातात ४ स्काऊट विद्यार्थी आणि १० प्रवासी जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये एका महिलेची प्रकृती गंभीर असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले

वांद्रे येथून निघालेली सूर्यनगरी एक्स्प्रेस जोधपूरला जात असताना सोमवारी पहाटे मारवाड जंक्शनला पोहोचली. येथून ही एक्सप्रेस ३.०९ वाजता पालीकडे जाण्यासाठी निघाली.त्याचवेळी जोधपुरच्या राजकियावास-बोमदरा भागात या गाडीचे ८ डबे रुळावरून घसरले. या गाडीचे ५३ ते ५५ क्रमांकाचे डबे घसरले. अपघात झाला त्यावेळी बहुतेक प्रवासी झोपेमध्ये होते. रेल्वे, पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघाताचे कारण समजू शकलेले नाही.

उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणाले की, ट्रेन रुळावरून घसरल्याने ११ डबे प्रभावित झाल्या आहेत, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, १० प्रवासी जखमी झाले आहेत. जोधपूरहून अपघातग्रस्त मदत गाडी घटनास्थळी पाठवण्यात आली आहे. सूर्यनगरी एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याची माहिती मिळताच उच्च अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी नेण्यासाठी बसेसची व्यवस्था केली. उत्तर पश्चिम रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.

हे ही वाचा:

निर्दयी कोण शिंदे की उद्धव ठाकरे?

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राडा का करतायत?

ब्राझिलचे महान फुटबॉलपटू, तीनवेळा विश्वविजेते ठरलेले पेले कालवश

स्थायी समिती अध्यक्षांचा वचपा?

उत्तर पश्चिम रेल्वे सीआरपीओने सांगितले की इतर माहितीसाठी प्रवासी आणि त्यांचे कुटुंबीय १३८ आणि १०७२ वर संपर्क साधू शकतात. गाडीतील एका प्रवाशाने सांगितले की, ‘मारवाड जंक्शनवरून निघाल्यानंतर ५ मिनिटांत गाडीच्या आत कंपनाचा आवाज आला आणि २-३ मिनिटांनी ट्रेन थांबली. आम्ही खाली उतरलो. त्यावेळी किमान ११ स्लीपर क्लासचे डबे रुळावरून घसरलेले दिसले. बचाव कार्य पूर्ण होईपर्यंत हा मार्ग बंद करण्यात आला आहे,

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा