32 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
घरदेश दुनियापृथ्वी जवळून जाणार एक लघुग्रह

पृथ्वी जवळून जाणार एक लघुग्रह

दुर्मिळ खगोलीय घटना असल्याची शास्त्रज्ञांची माहिती

Google News Follow

Related

नासा ही अवकाशातील बदल होत असणाऱ्या घटनांवर नवनवीन माहिती सतत पुरवत असते. आता नुकतेच नासाने पृथ्वीवर येणाऱ्या नवीन लघुग्रहाबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे. एक भव्य लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने सरकला असून नासाने या उपग्रहाचा वेग आणि अंतर याबाबतची माहिती दिली आहे. अस्ट्रोइड म्हणजे लघुग्रह. आकाशातून हे लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येत असतात. काही लहान असतात तर काही मोठे लघुग्रह असतात. शास्त्रज्ञांच्या मते हे लघुग्रह आपल्या पृथ्वीसाठी धोकादायक नसल्याचे सांगितले आहे. हे लघुग्रह आणि पृथ्वी अगदी जवळ असून त्यांच्यामधील अंतर जरी कमी असले तरी, ते आपल्याला काहीच धोका पोहचवू शकणार नाहीत.

नासाच्या उपलब्ध माहितीनुसार, खगोलशात्राज्ञांच्या मते, डी झेड टू २०२३ हा लघुग्रह शनिवारी चंद्राच्या कक्षेपासून ३२०,००० मैल म्हणजे ५,१५००० किलोमीटर अंतरावरून जाणार आहे. याचा आकार १३० फूट ते ३०० फूट असा असून त्यापेक्षा जास्त पण असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याची उंची ७३ मीटर इतकी असेल. अवकाशात अनेक लघुग्रह हे फिरत असतात. पण इतक्या मोठ्या आकाराचा लघुग्रह पृथ्वी जवळून जाण्याची ही दुर्मिळ घटना असून, अशा प्रकारच्या घटना या काही दशकांमध्ये क्वचितच घडत असल्याचे नासाने म्हटले आहे.

हे ही वाचा:

 सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा, नव्या पेन्शन योजनेसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली ही  घोषणा

वॉशिंग्टनमध्ये काश्मीर मुद्द्यावरून गोंधळ घालणाऱ्या पाकिस्तानींना हाकलून लावले!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी गेली; दोन वर्षांच्या शिक्षेमुळे कारवाई

जागतिक उद्दिष्ट २०३० पण भारत २०२५ पर्यंत क्षयरोग मूक्त होणार

हा लघुग्रह इतका मोठा आहे की, यामुळे एखादे शहर सहज पुसून टाकू शकेल. परंतु नासाने हा ग्रह पृथ्वीवर येणार नसल्याचे म्हटले आहे. खगोल प्रेमींसाठी हा लघुग्रह म्हणजे निरीक्षण करण्याची एक चांगली संधी असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, अंतराळात धूमकेतू, उल्का , लघुग्रह यांसारखे अनेक घटक आजूबाजूला आहेत. हे घटक स्वतः फिरत असताना पृथ्वीच्या कक्षेत पृथ्वीच्या जवळ येऊ शकतात. गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या आजूबाजूच्या वस्तुसुद्धा या ग्रहांकडे आकर्षित होत असतात. म्ह्णून उल्का आणि लघुग्रह यासारखे घटक पृथ्वीच्या जवळून गेले तरी त्याचा पृथ्वीला धोका नसल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा