33 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरक्राईमनामापत्नीचे कान भरत असल्याच्या संशयावरून दोन शेजाऱ्यांवर सपासप वार

पत्नीचे कान भरत असल्याच्या संशयावरून दोन शेजाऱ्यांवर सपासप वार

दोघांचा मृत्यू तिघे गंभीर हल्लेखोराला अटक 

Google News Follow

Related

शेजाऱ्यानी पत्नीचे कान भरल्यामुळे पत्नी मुलासह आपल्याला सोडून गेली या संशयावरून मानसिक तणावात असणाऱ्या ५५ वर्षीय इसमाने शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबावर चाकूने हल्ला  केल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास  दक्षिण मुंबईतील दादासाहेब भडकमकर मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पार्वती मेन्शन येथे घडली. या हल्ल्यात जेष्ठ नागरिक असणाऱ्या दाम्पत्याचा मृत्यू झाला असून  इमारतीचा सफाई कर्मचाऱ्यासह तीन जण गंभीररीत्या जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी नायर आणि एच.एन रिलायन्स रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिसांनी हल्लेखोर इसमाला ताब्यात घेतले आहे.

चेतन रतनशी गाला (५५) असे ताब्यात घेण्यात आलेल्या हल्लेखोराचे नाव आहे. जयेंद्र मेस्त्री आणि निला मेस्त्री  हे जेष्ठ नागरिक दाम्पत्याचा या हल्ल्यात मृत्यू झाला असून स्नेहल ब्रम्हभट्ट (४२)मुलगी जेनील (१८) आणि इमारतीचा सफाई कर्मचारी प्रकाश वाघमारे  असे हल्ल्यात गंभीर जखमी  झालेल्या चे नाव आहे. ह्ल्लेखोर चेतन गाला हा पत्नी आणि तीन मुलासह दक्षिण मुंबईतील दादासाहेब भडकमकर मार्ग, पार्वती मेन्शन या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहण्यास होता. चेतन गाला याची आई आणि वडील दोन इमारत सोडून राहण्यास आहे. चेतन गाला याचा गिरगाव येथे एक दुकान असून त्याने ते भाड्याने चालविण्यास दिलेले आहे दुकानाच्या भाड्यावर तो आपल्या उदरनिर्वाह करीत होता. चेतन गाला हा संशयीवृतीचा इसम असून तो पत्नीवर संशय घेत असल्यामुळे त्याच्यात सतत वाद होत असल्यामुळे दोन महिन्यापूर्वी पत्नी मुलासह माहेरी निघून गेली होती. त्याने पत्नीला परत येण्यासाठी त्याने विनंती करून देखील ती परत येत नसल्यामुळे तसेच घरात एकटं राहून तो मानसिक तणावात गेला होता.

हे ही वाचा:

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी गेली; दोन वर्षांच्या शिक्षेमुळे कारवाई

‘पंतप्रधानांचा अपमान देशातील जनता सहन करणार नाही’

जाणून घ्या आजच्या ‘मत्स्य जयंतीबद्दल’

पासपोर्ट मिळाला नाही..अमृतपाल परदेशात पलायन करणार ?

पत्नी सोडून गेल्याचा ठपका त्याने शेजाऱ्यावर ठेवला होता, माझ्या पत्नीला माझ्याविरुद्ध तुम्ही लोक भडकावत  होते  म्हणून माझी पत्नी मला सोडून गेली, माझा संसार तुमच्यामुळे उध्वस्त होत आहे असा आरोप चेतन शेजाऱ्यावर करून त्याच्याशी भांडत होता, शुक्रवारी  दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हे भांडण अगदी टोकाला गेले, आणिचेतन याने घरातून सुरा आणून त्याने प्रथम शेजारी राहणाऱ्या जेष्ठ नागरिक जयेंद्र मेस्त्री आणि त्याची पत्नी निला यांच्यावर सपासप वार केले, त्यानंतर तो दुसऱ्या घरात घुसुन स्नेहल ब्रम्हभट्ट आणि तिची मुलगी  जेनील हिच्यावर वार केले, आरडा ओरड ऐकून इमारतीचा सफाई कर्मचारी प्रकाश वाघमारे हा बचावासाठी गेला असता हल्लेखोर चेतन याने त्याच्यावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. पार्वती मेन्शन हि इमारत भररस्त्यात असल्यामुळे तेथील गोधळ आणि आरडाओरड ऐकून  लोकांची एकच गर्दी जमा झाली.

याघटनेची माहिती मिळताच दादासाहेब भडकमकर मार्ग पोलीसानी घटनास्थळी धाव घेऊन हल्लेखोर चेतन याला हत्यारासह ताब्यात घेतले, व इतर रहिवाश्याच्या मदतीने जखमींना उपचारासाठी नायर आणि एच.एन रिलायन्स रुग्णालय या ठिकाणी आणले, दरम्यान जखमींपैकी जायन्द्र मिस्त्री आणि त्याची पत्नी निला मिस्त्री यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला असून इतर तिघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी डीबी. मार्ग पोलिसांनी चेतन रतनशी गाला याच्याविरुद्ध हत्याच गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीची पत्नी मुलासह सोडून गेल्यामुळे तो मानसिक तणावात होता त्यातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा