27 C
Mumbai
Tuesday, March 28, 2023
घरदेश दुनियाहिंदू मंदिरांवर हल्ले,ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी दिला हा दिलासा

हिंदू मंदिरांवर हल्ले,ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी दिला हा दिलासा

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनिझ सध्या ११ मार्चपर्यंत भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदाय आणि मंदिरांना लक्ष्य करून तोडफोड आणि हिंसाचाराच्या घटनांवर पंतप्रधान मोदींनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

Google News Follow

Related

गेल्या काही महिन्यांपासून ऑस्ट्रेलियात हिंदू मंदिरांवर हल्ले होण्याच्या घटना वारंवार होत आहेत.या हल्ल्यांमुळे येथील भारतीय समुदयामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनिझ यांनी मोठा दिलासा दिला आहे.

आपलं सरकार ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाची सुरक्षितता आणि शांतता याला प्राधान्य देईल असे आश्वासन पंतप्रधान  अल्बानीज यांनी दिलं आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनिझ सध्या ११ मार्चपर्यंत भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदाय आणि मंदिरांना लक्ष्य करून तोडफोड आणि हिंसाचाराच्या घटनांवर पंतप्रधान मोदींनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

ऑस्ट्रेलियातील खलिस्तान समर्थक संघटनांनी निर्माण केलेल्या अशांततेवरही  दोन्ही पंतप्रधानांमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली . त्यानंतर  पंतप्रधान  अल्बनिझ यांनी  ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाच्या सुरक्षिततेला  प्राधान्य देण्यात येईल असे पंतप्रधान मोदी यांना आश्वासित केलं. माध्यमांशी बोलतानाही पंतप्रधान मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांच्या बातम्या ऑस्ट्रेलियातून सातत्याने येत आहेत ही खेदाची बाब आहे. अशा बातम्यांनी भारतातील प्रत्येकजण चिंताग्रस्त होत आहे.

हे ही वाचा:

“गुम है किसी के प्यार में” या प्रसिद्ध मालिकेचा सेट जळून खाक

साई रिसॉर्ट वायकरांच्या पंचतारांकित प्लॅनसमोर चिल्लरच

तरुणाने शेपटाला छेडले आणि वाघ त्याच्यावर उलटला..नंतर जे झाले ते वाईट होते

…म्हणून राज ठाकरे म्हणतात सत्तेपासून आपण दूर नाही!

आता पर्यंत ४ हल्ले

अलीकडेच शनिवार,३ मार्चला खलिस्तान समर्थकांनी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिराची तोडफोड केली. याआधी जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये १५ दिवसांत तीन हिंदू मंदिरांवर हल्ला झाला होता. दोन महिन्यांत ऑस्ट्रेलियातील मंदिरावर हल्ला होण्याची  ही चौथी घटना आहे.

ऑस्ट्रेलियात ६.८४ लाख हिंदू

ऑस्ट्रेलियात हिंदूंची एकूण लोकसंख्या ६.८४ लाख आहे. हिंदू हा इथला तिसरा मोठा धर्म आहे. २०२१ च्या जनगणनेनुसार ऑस्ट्रेलियाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण २.७% आहे. परदेशी विद्यार्थ्यांमध्ये चीननंतर भारतीय विद्यार्थ्यांची संख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,876चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
65,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा