29 C
Mumbai
Wednesday, November 30, 2022
घरदेश दुनियाइराणमधील हिजाबविरोधी आंदोलनाची आग खोमेनी यांच्या घरापर्यंत

इराणमधील हिजाबविरोधी आंदोलनाची आग खोमेनी यांच्या घरापर्यंत

महसा अमिनीच्या मृत्यूनंतर हिजाबविरोधी निदर्शने सातत्याने तीव्र होत आहेत

Google News Follow

Related

मागील तीन महिन्यांपासून इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनं सुरु आहेत. महसा अमिनीच्या मृत्यूनंतर हिजाबविरोधी निदर्शने सातत्याने तीव्र होत आहेत. आंदोलन दडपण्यासाठी सुरक्षा दलाच्या कारवाईत आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय एका आंदोलकालाही फाशी देण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला खोमेनी यांच्या खोमेन घराला पेट्रोल बॉम्बच्या सहाय्याने आग लावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासोबतच इराणसरकारसह खोमेनी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आंदोलक इराणच्या सर्वोच्च धार्मिक नेत्याच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहेत. ‘हे वर्ष रक्ताचे वर्ष आहे, सर्वोच्च धर्मगुरू खोमेनी यांचाही पतन होईल’, अशा जोरदार घोषणाबाजी या व्हिडिओतून ऐकू येत आहेत. तेहरानमध्ये हा भयंकर निषेध करण्यात आला, त्यामागे संग्रहालयाच्या अनेक भागांमध्ये धगधगत्या ज्वालाही दिसत आहेत. खोमेनी यांच्या घरासह-संग्रहालयाला आग लावण्यासाठी आंदोलक पेट्रोल बॉम्बचा वापर करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. इराणमधील हिजाबविरोधी कायदा आंदोलनाच्या समर्थनार्थ अनेक देशांमध्ये प्रतिकात्मक आंदोलनेही झाली आहेत.

हे ही वाचा : 

अर्थसंकल्पाची तयारी सुरू झाली!

स्कुल व्हॅन चालकाने विद्यार्थ्यांनीवर अतिप्रसंग करण्याचा केला प्रयत्न

श्रद्धा वालकर, लव्ह जिहाद आणि हिंदू-मुस्लिम विवाह

धक्कादायक! समाजसेविकेनेच पाच दिवसांचे बाळ विकले

यापूर्वी मुली आणि महिलांनी केस कापतानाचे व्हिडिओ पोस्ट करून इराणी आंदोलकांना पाठिंबा दर्शवला आहे. गुरुवारी इराणच्या किमान २३ शहरांमध्ये निदर्शने झाली. या निदर्शनांमध्ये आत्तापर्यंत तीनशेहून अधिक लोक मारले गेले असल्याची माहिती आहे. हिजाबविरोधी आंदोलनांचे आता सरकारविरोधी निदर्शनात रूपांतर झाले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,950चाहतेआवड दर्शवा
1,976अनुयायीअनुकरण करा
52,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा