पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात एका मदरशात स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला असून काही लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर घटनास्थळी बचावकार्य सुरू असून अधिकाऱ्यांकडून पुढील तपास केला जात आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील अक्कोरा खट्टक जिल्ह्यात असलेल्या दारुल उलूम हक्कानिया या मदरशात शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी स्फोट झाला. या स्फोटात किमान पाच जणांचा मृत्यू झाला आणि २० जण जखमी झाले आहेत. आपत्कालीन मदत करणारे पथक घटनास्थळी पोहोचले असून कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
मदरशाच्या मुख्य सभागृहात शुक्रवारच्या नमाज दरम्यान हा स्फोट झाला. यानंतर अधिकाऱ्यांनी नौशेरामध्ये आणीबाणी जाहीर केल्याची माहिती आहे. प्राथमिक तपासानुसार हा आत्मघातकी स्फोट असल्याचे बोलले जात आहे. तसेच मौलाना हमीदुल हक हक्कानी यांना लक्ष्य करण्यासाठी हा स्फोट असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जमियत उलेमा-ए-इस्लाम (सामी) चे प्रमुख म्हणून नेतृत्व करणारे मौलाना हक्कानी हे दिवंगत मौलाना समीउल हक यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. नोव्हेंबर २००२ ते २००७ पर्यंत राष्ट्रीय असेंब्लीमध्ये त्यांचा कार्यकाळ होता. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर, त्यांनी जामिया दारुल उलून हक्कानिया येथे कुलगुरू आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (सामी) चे अध्यक्ष म्हणून भूमिका स्वीकारली. यापूर्वी, माजी पंतप्रधान भुट्टो यांच्या हत्येत सहभागी असल्याचा आरोप झाल्यानंतर मदरशाची छाननी करण्यात आली होती.
हे ही वाचा :
अलिबागच्या समुद्रात मच्छिमार बोट भस्मसात!
बांगलादेशात शेख मुजीबुर रहमान, इंदिरा गांधी; हसीना शेख यांच्या खुणा पुसण्यास सुरुवात
५०० अधिकारी, ड्रोनचा वापर, डॉग स्क्वॉड, स्थानिकांची मदत…अखेर आरोपी दत्तात्रय गाडेला अटक!
उत्तराखंडमध्ये हिमस्खलन; ४७ कामगार अडकले
पाकिस्तानचे पंतप्रधान रोहबाज शरीफ यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आणि मौलाना हक आणि इतर जखमींच्या प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना केली, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना जखमींना वैद्यकीय सेवा देण्याचे निर्देश दिले असून घटनेचा सविस्तर अहवाल मागितला आहे.







