दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा ‘छावा’ देशभरात धुमाकूळ घालत आहे. १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला असून चित्रपटाने ४०० कोटींचा गल्ला जमवला आहे. अशातच आता छावाची जादू तेलुगूमध्येही चालणार आहे. चाहत्यांच्या प्रचंड मागणीनुसार, ‘चावा’ हा चित्रपट तेलुगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपटाने हिंदीमध्ये चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला असून आता तेलुगूमध्येही हिट होण्यास सज्ज आहे.
‘छावा’ हा चित्रपट ७ मार्च २०२५ रोजी आंध्र प्रदेशातील चित्रपटगृहांमध्ये तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. या संदर्भात चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे. त्यामुळे यानंतर, छावाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आणखी वाढणार आहे. ‘छावा’ हा चित्रपट विकी कौशलच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक बनला आहे. अभिनयाबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटातील विकीच्या अभिनयाने सर्वांच्या मनाला स्पर्श केला आहे.
छत्रपती संभाजी महाराजांवर झालेला अत्याचार, महाराजांनी सोसलेल्या यातना अभिनेत्याने हुबेहुबे सादर करण्याचा प्रयत्न केला. चित्रपटातील अनेक अशी दृश्ये आहेत जी मने हेलावून टाकणारी आहेत. ही दृश्ये पाहून प्रेक्षकांनी डोळ्यात पाणी आणले. अनेकजण चित्रपटगृहात, चित्रपटगृहाबाहेर येवून ढसाढसा रडले. छत्रपती संभाजी महाराजांवरील मुघलांचे अत्याचार पाहून एका प्रेक्षकाने तर सिनेमाचा पडदा टराटरा फाडला होता.
हे ही वाचा :
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात मदरशात स्फोट; पाच जणांचा मृत्यू
बांगलादेशात शेख मुजीबुर रहमान, इंदिरा गांधी; हसीना शेख यांच्या खुणा पुसण्यास सुरुवात
अलिबागच्या समुद्रात मच्छिमार बोट भस्मसात!
५०० अधिकारी, ड्रोनचा वापर, डॉग स्क्वॉड, स्थानिकांची मदत…अखेर आरोपी दत्तात्रय गाडेला अटक!
दरम्यान, ‘छावा’ चित्रपटाचा टीजर समोर येताच चित्रपट मोठी कमाई करेल अशी आशा व्यक्त केली जात होती. त्याच प्रमाणे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसात १०० कोटींचा आकडा पार केला. त्यानंतर चित्रपटाची घोडदौड सुरूच आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने ४०० कोटींचा आकडाही पार केला आहे.