काँग्रेसचे नेते डी. के शिवकुमार यांनी सद्गुरू तथा जग्गी वासुदेव यांची भेट घेतल्यानंतर आणि महाशिवरात्रीला त्यांच्या कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर त्याकडे वेगळ्या कोनातून पाहण्यात आले. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्याबद्दल स्तुतीसुमने उधळताना पाहून आश्चर्य व्यक्त होत आहे.
एका व्हीडिओत दिग्विजय सिंह हे मोदी आणि बागेश्वर बाबा यांची स्तुती करताना दिसत आहेत. ते म्हणतात की, बुंदेलखंडमध्ये कर्करोगाचे रुग्णालय उघडण्यात आले आहे. त्यासाठी मी बागेश्वर धामच्या बाबा धीरेंद्र शास्त्री तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. हीच नारायण सेवा आहे. अशा पद्धतीने शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांत गरीबांची मदत केली गेली आणि अशा संस्थांकडे लक्ष दिले गेले तर त्याचा नक्कीच चांगला परिणाम होईल. हाच सनातन धर्माचा राजमार्ग आहे. नर हाच नारायण आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात मदरशात स्फोट; पाच जणांचा मृत्यू
महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर कुंभमेळ्यात जगभरातील कोट्यवधींनी केले स्नान
सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेले तुहिन कांत पांडे कोण आहेत?
यावर आता सोशल मीडियामध्ये अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. जितेंद्र नागर यांनी म्हटले आहे की, महाकुंभच्या पवित्र स्नानामुळे मन मस्तिष्क आणि जिभेचेही शुद्धीकरण होते. दिग्विजय सिंह हेदेखील महाकुंभमध्ये सहभागी झाले होते. त्यांनीही पवित्र स्नानाचा अनुभव घेतला होता.
एका युजरने हे दिग्गी राजा यांचे हृदयपरिवर्तन असल्याचे म्हटले असून एकाने दिग्विजय सिंह यांचे सूर बदलल्याचे म्हटले आहे. भाजपाचे नेता नरेंद्र सलुजा यांनी म्हटले आहे की, याआधी काँग्रेसचे नेते बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्यावर टीका करत असत पण आता काँग्रेस नेते दिग्विजय सिंह त्यांचे अभिनंदन करत आहेत.