29.8 C
Mumbai
Friday, May 3, 2024
घरक्राईमनामापबजीच्या नादात त्याने आई, भाऊ, बहिणींना घातल्या गोळ्या!

पबजीच्या नादात त्याने आई, भाऊ, बहिणींना घातल्या गोळ्या!

Google News Follow

Related

पबजी या गेमचा फटका लहान मुलांना बसतो हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. पण पाकिस्तानातील एका मुलाने तर पबजीच्या नादात आपल्या कुटुंबालाच ठार मारले. १४ वर्षांच्या या मुलाने आपल्या संपूर्ण कुटुंबाला गोळ्या घालून मारल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

लाहोरच्या कहाना या विभागात ही घटना घडली. त्याची आई नाहिद मुबारक (४५), २२ वर्षीय मुलगा तैमूर, दोन १७ आणि ११ वर्षांच्या बहिणी मृतावस्थेत आढळल्या.

पबजी या गेमचा नाद या मुलाला लागला होता. त्याने या नादात आपल्या कुटुंबियांना मारल्याचे पोलिसांसमोर कबुल केले. बराच काळ पबजी खेळत असल्यामुळे त्याला मानसिक समस्या निर्माण झाल्या होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाहिद या आपल्या मुलाला पबजी खेळू नकोस, अभ्यास कर असे सातत्याने सांगत असत. पण त्याकडे तो दुर्लक्ष करत असे. त्याचा बराचसा वेळ हा पबजी गेम खेळण्यातच जात असे.

ही घटना घडली त्यादिवशी आई पुन्हा एकदा त्याला पबजीवरून ओरडली. पण त्यानंतर त्या मुलाने आईची कपाटात ठेवलेली पिस्तुल घेतली आणि तिच्यावर गोळी झाडली. नंतर त्याने झोपलेल्या आपल्या भावंडांवरही गोळ्या झाडल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

हे ही वाचा:

आश्चर्य!!! सहा महिने बेशुद्ध राहून कोरोनावर केली मात

… म्हणून क्रिकेटपटू पीटरसनने मोदींना लिहिले हिंदीतून पत्र

नागेश्वरन भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार

‘अनिल देशमुख पोलिसांच्या बदली, पोस्टिंगची यादी द्यायचे’

 

दुसऱ्या दिवशी या मुलाने आरडाओरडा करत आपल्या कुटुंबाची हत्या झाल्याचे शेजाऱ्यांचा सांगितले. आपण वर झोपलेलो असताना कुणी कुटुंबाला मारले हे आपल्याला माहीत नाही, असे त्याने पोलिसांना सांगितले. पण नंतर पोलिसांनी चौकशी केली असता त्याच्या आईने कुटुंबाच्या रक्षणार्थ एक पिस्तुल घरात ठेवले असल्याचे स्पष्ट झाले. अद्याप या हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तुल सापडलेले नाही. त्याचा शोध सुरू आहे.

लाहोरमध्ये घडलेली ही अशा प्रकारची चौथी घटना आहे. गेल्या दोन वर्षांत तीन तरुणांनी या गेमच्या नादापायी आत्महत्या केल्या. जागतिक आरोग्य संघटनेने गेममुळे होणाऱ्या आजारांचा समावेश केला आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा