31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
घरदेश दुनिया... म्हणून क्रिकेटपटू पीटरसनने मोदींना लिहिले हिंदीतून पत्र

… म्हणून क्रिकेटपटू पीटरसनने मोदींना लिहिले हिंदीतून पत्र

Google News Follow

Related

यंदा भारत आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. ७३ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताशी चांगले संबंध आणि भारतीयांशी आपुलकी असलेल्या जगभरातील अनेक खेळाडू तसेच इतर मान्यवरांना पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचा माजी तडाखेबाज सलामीवीर फलंदाज मॅथ्यू हेडनला पत्र पाठवले आहे. ख्रिस गेल, जाँटी ऱ्होड्स आणि केविन पीटरसननंतर मॅथ्यू हेडन पंतप्रधानांकडून असे पत्र पाठवण्यात आलेला चौथा आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरला आहे.

नरेंद्र मोदी यांचे पत्र मिळाल्यानंतर मॅथ्यू हेडनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “भारताने माझं आयुष्य बदलून टाकलं आहे. आपल्या दोन्ही महान राष्ट्रांमधील संबंध अधिकाधिक वृद्धिंगत व्हावेत यासाठी प्रयत्न करण्याच्या माझ्या भूमिकेचा मी मनापासून स्वीकार करत आहे. भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हे पत्र मिळणे हा मी माझा सन्मान समजतो. लोकशाही आणि मानवी हक्कांचे संरक्षण करण्यात भारताची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. मला भारत आवडतो. इथली विविधता, बदल स्वीकारण्याची इथली वृत्ती, संस्कृतीचे संरक्षण करण्याची क्षमता यांचा मी कायमच चाहता राहिलो आहे”, असं मॅथ्यूने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसन यालाही पत्र लिहून शुभेच्छा दिल्या आहेत. केविन यानेही नरेंद्र मोदी यांच्या पत्राला उत्तर दिले आहे. विशेष म्हणजे त्याने नरेंद्र मोदी यांच्या इंग्रजीतील पत्राला हिंदीतून उत्तर दिले आहे. ‘नरेंद्र मोदीजी आपल्या पत्रासाठी धन्यवाद. २००३ मध्ये मी भारतात पाऊल ठेवल्यापासून प्रत्येक भेटीत भारताबद्दलचे माझे प्रेम वाढले आहे. भारत आपल्या वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी जे कार्य करत आहे यासाठी धन्यवाद देण्यासाठी मी तुम्हाला लवकरच प्रत्यक्ष भेटण्यास उत्सुक आहे!’ अशा भावना केविन याने व्यक्त केल्या आहेत.

हे ही वाचा:

शिवसेना विभाग प्रमुखाला भररस्त्यात महिलेने दिला चोप

‘अनिल देशमुख पोलिसांच्या बदली, पोस्टिंगची यादी द्यायचे’

नागेश्वरन भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार

स्वातंत्र्य लढ्यातील महिला सेनानींची ‘अमर चित्रकथा’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॉन्टी रोड्‌स व ख्रिस गेल यांनाही पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्याला उत्तर देताना हे दोन्ही खेळाडू भारावले. त्यांनी आपआपल्या सोशल मीडिया अकाउंटमधून मोदी यांचे आभार मानून तसेच भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा