26 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरक्राईमनामामक्कीला ग्लोबल टेररिस्ट म्हणून घोषित करणाऱ्या प्रस्तावावर चीनचा खोडा

मक्कीला ग्लोबल टेररिस्ट म्हणून घोषित करणाऱ्या प्रस्तावावर चीनचा खोडा

Related

भारत आणि अमेरिका या दोन देशांनी संयुक्तपणे लष्कर-ए-तोयबाचा म्हणजेच LeT चा उपप्रमुख अब्दुल रहमान मक्की याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात यावं यासाठी संयुक्त राष्ट्रात म्हणजेच युनायटेड नेशन्समध्ये प्रस्ताव ठेवला होता. भारत आणि अमेरिका दोन्ही देशांनी त्याला देशांतर्गत कायद्यांनुसार दहशतवादी म्हणून घोषित केलेलं आहे. जेव्हा अमेरिकेसह भारताने अब्दुल रहमान मक्की याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी सुरक्षा परिषदेच्या समिती अंतर्गत संयुक्त ठराव सादर केला. तेव्हा हा प्रस्ताव भारताने सर्व सदस्यांमध्ये प्रसारित केला होता. याला इतर देशांनी पाठिंबा सुद्धा दिला पण, मक्कीला जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्याच्या प्रस्तावावर चीनने अखेरच्या क्षणी आडकाठी घातली. तांत्रिक अडथळा आणला म्हणजेच टेक्निकल होल्ड आणला. यानंतर अर्थात भारताकडून चीनच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

मक्कीविरुद्ध पुरेसे पुरावे असूनही केवळ हेकेखोरवृत्तीने चीनने त्याला या यादीत टाकण्याला विरोध केला आहे. शिवाय चीन दहशतवाद विरोधी असल्याचा दावा करत असतो त्यामुळे चीनची ही भूमिका विरोधाभास असल्याचं आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

अब्दुल रहमान मक्की कोण आहे?

अब्दुल रहमान मक्की हा लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज मुहम्मद सईद याचा मेहुणा आहे. शिवाय लष्कर-ए-तोयबाच्या अनेक कारस्थानांचं याने म्होरक्या म्हणून काम पाहिलेलं आहे. शिवाय लष्कर-ए-तोयाबासाठी फंड मिळवण्याचं काम करण्यामध्ये मक्कीची भूमिका होती. दहशतवादी संघटनेमध्ये तरुणांची भरती करायची, त्यांना कट्टरपंथी बनवायचं, हल्ल्याची योजना आखायची अशी कामं हा मक्की करायचा. विशेषतः जम्मू काश्मीरमध्ये हिंसाचार घडवण्यामध्ये याची प्रमुख भूमिका होती.

भारतात डिसेंबर २०००मध्ये लाल किल्ल्यावर झालेला दहशतवादी हल्ला, रामपूर सीआरपीएफ कॅम्पवर जानेवारी २००८ मध्ये झालेला हल्ला, मुंबईत २६ नोव्हेंबर रोजी झालेला दहशतवादी हल्ला, त्यानंतर श्रीनगरमधल्या करन नगर इथे फेब्रुवारी २०१८ मध्ये हल्ला झाला होता, मे २०१८ ला बारामुल्ला इथल्या खानपोरामध्ये हल्ला झाला होता, जून २०१८मध्ये श्रीनगरमध्ये हल्ला झाला आणि ऑगस्ट २०१८मध्ये बांदीपोरा इथे हल्ला झाला होता. या सगळ्या हल्ल्यांची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाने घेतल्यामुळे अब्दुल रहमान मक्कीचा नक्कीच या हल्ल्यांमध्ये सहभाग होता.

अमेरिकेने २ मिलियन डॉलर इतकं बक्षीस अब्दुल रहमान मक्की याच्यासाठी जाहीर केलं आहे. मक्कीला पाकिस्तान सरकारने १५ मे २०१९ रोजी अटक केली होती आणि लाहोरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. २०२० मध्ये, त्याला दहशतवादाला वित्तपुरवठा म्हणजेच फंडिंग केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं आणि पाकिस्तानी न्यायालयाने त्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मात्र, अमेरिकेला सतत त्याच्याबद्दल माहिती हवी असते कारण पाकिस्तानी न्यायव्यवस्थेने आधी दोषी ठरलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सोडून दिलं आहे. त्यामुळे मक्की याला ग्लोबल टेररिस्ट घोषित करावं अशी मागणी भारत आणि अमेरिकेने केली आहे. पण चीनने जागतिक स्तरावर दहशतवाद संपवण्याच्या भारताच्या लढ्यात खोडा घातलाय.

हे ही वाचा:

धक्कदायक! सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील नऊ जणांची आत्महत्या

मुंबई पालिकेत नोकरी लावतो सांगत आठ लाखांचा गंडा

चौथ्यादिवशीही राहुल गांधी ईडीच्या फेऱ्यात

रेणू शर्मा खंडणी प्रकरणात आरोपपत्र दाखल, मानसिक छळामुळे मुंडेंना ब्रेनस्ट्रोक

चीनने अशा गोष्टीत हेकेखोरपणा करण्याची ही पहिली वेळ नाहीये. यापूर्वीही पाकिस्तानस्थित आणि संयुक्त राष्ट्रांकडून निषिद्ध असलेली दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याला सुद्धा ग्लोबल टेररिस्ट म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावावर चीनने रोख आणला होता. भारताने जेव्हा जेव्हा अझहरला ग्लोबल टेररिस्ट म्हणून घोषित करण्यासाठी प्रस्ताव मांडला तेव्हा चीनने त्याला खोडा घातलाय. मात्र, चीन दहशतवादाच्या विरोधात आहे. दहशतवादी कारवायांना चीन पाठींबा देत नाही, असं चीनकडून सांगण्यात येत असतं. मात्र, टेक्निकल होल्ड हा पर्याय वापरून चीन खोडसाळपणा दाखवत दहशतवादाला पसरण्यासाठी चालना देत असतो, हे चित्र आता स्पष्ट झालं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,919चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
14,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा