27 C
Mumbai
Tuesday, August 9, 2022
घरक्राईमनामाअनिल परबांना उद्या ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

अनिल परबांना उद्या ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

Related

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अनिल परब यांना सोमवार, २० जून रोजी ईडीने दुसऱ्यांदा नोटीस बजावली आहे. यानुसार अनिल परब यांना चौकशीसाठी मंगळवार, २१ जून रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विधान परिषदेच्या निकालानंतर मतमोजणी सुरू असताना अनिल परब यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना चौकशीसाठी मंगळवारी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी अनिल परब यांना यांना ईडीचे पहिले समन्स १४ जून रोजी बजावले होते. त्यांना दापोली येथील रिसॉर्टशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी सक्तवसूली संचालनालयाकडून समन्स बजावण्यात आले होते. तर, १५ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. तेव्हा ते चौकशीसाठी गैरहजर राहिले होते. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते मुंबईत नव्हते आणि ईडी कार्यालयात अनिल परब जाऊ शकले नाहीत, असे वकिलामार्फत अनिल परब यांनी ईडीला कळवले होते.

हे ही वाचा:

टिळक, जगताप यांच्या मतदानावरील आक्षेप फेटाळले

रेणू शर्मा खंडणी प्रकरणात आरोपपत्र दाखल, मानसिक छळामुळे मुंडेंना ब्रेनस्ट्रोक

मलिक, देशमुखांची ‘सर्वोच्च’ निराशा

धक्कदायक! सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील नऊ जणांची आत्महत्या

अनिल परब यांनी दापोलीत अनधिकृत रिसॉर्ट बांधल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. या रिसॉर्ट प्रकरणात काही दिवसांपूर्वी अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीकडून धाडसत्र हाती घेण्यात आलं होतं. त्यांच्याशी संबंधित सात संस्थांवर ईडीने काही दिवसांपूर्वी धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर ईडीकडून अनिल परब यांना अटक होणार का अशा जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. २६ जून २०१९ ला अनिल परब यांनी साई रिसॉर्ट कर भरल्याची मूळप्रत ईडीच्या हाती लागली आहे. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,918चाहतेआवड दर्शवा
1,924अनुयायीअनुकरण करा
15,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा