27 C
Mumbai
Tuesday, August 9, 2022
घरराजकारणकाँग्रेसच्या सुबोधकांत सहाय यांचे पंतप्रधान मोदींबाबत अश्लाघ्य विधान

काँग्रेसच्या सुबोधकांत सहाय यांचे पंतप्रधान मोदींबाबत अश्लाघ्य विधान

Related

देशात असहिष्णुता वाढल्याचा डांगोरा पिटणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना मोदींची गेल्या आठ वर्षातील वाटचाल खुपत असल्याचे वारंवार दिसते. काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री आणि नेते सुबोधकांत सहाय यांनी या असहिष्णुतेचे दर्शन देशाला घडविले आहे. टोकाच्या मोदीविरोधापायी अत्यंत खालच्या भाषेतील वक्तव्य त्यांनी एका सभेत केले. मोदींची हिटलरशी तुलना करताना मोदींच्या मृत्यूची कल्पनाही केली. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे.

सोमवारी दिल्लीत सत्याग्रह आंदोलनाच्या निमित्ताने काँग्रेसचे कार्यकर्ते जमले होते. राहुल गांधी यांना ईडीने चौकशीला बोलावल्यापासून काँग्रेसची देशभरात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. शिवाय, केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेविरोधातही काँग्रेसने आंदोलन केले. त्यावेळी बोलताना सहाय यांनी खालची भाषा वापरली.

मोदींवर अत्यंत खालच्या भाषेत टीका करताना सहाय म्हणाले की, मोदींनी हिटलरची मर्यादा ओलांडली आहे. त्यांचा मृत्यूही हिटलरप्रमाणेच होईल.

हे ही वाचा:

‘मोदींमुळे लोक गरिबीतून बाहेर येत आहेत’

कोकण रेल्वेचं विद्युतीकरणाचे काम पूर्ण; पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा  

मलिक, देशमुखांची ‘सर्वोच्च’ निराशा

टिळक, जगताप यांच्या मतदानावरील आक्षेप फेटाळले

 

पण नंतर सहाय यांनी सारवासारव करताना म्हटले की, माझा म्हणण्याचा अर्थ वेगळा होता. जो हिटलर की चाल चलेगा, वो हिटलर की मौत मरेगा ही घोषणा सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यामुळेच मी तसे बोललो. मोदींनीही अशी घोषणा दिली असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर २०१४मध्ये केंद्रात सरकार आल्यापासून काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी अशाप्रकारची खालच्या भाषेतील टीका केली आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनीही अशी अश्लाघ्य वक्तव्ये केलेली आहेत. चौकीदार चोर है, मौत का सौदागर अशी विधाने या नेत्यांनी केलेली आहेत. हेच राहुल गांधी सर्वांना प्रेमाने जिंकले पाहिजे अशी विधाने करत असतात. मागे महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपण मोदींना मारू शकतो, असे विधान केले होते. नंतर त्यातून पळवाट काढण्याचा प्रयत्नही त्यांनी केला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,918चाहतेआवड दर्शवा
1,924अनुयायीअनुकरण करा
15,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा