35 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरदेश दुनिया२०२५ मध्ये चीन तैवानवर कब्जा करणार?

२०२५ मध्ये चीन तैवानवर कब्जा करणार?

Google News Follow

Related

अलिकडच्या वर्षांत चीनने पुन्हा एकदा तैवानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्यानंतर, तैवान चिंतेत आहे. कम्युनिस्ट चीन २०२५ सालापर्यंत तैवानवर “पूर्ण कब्जा” करण्यासाठी आक्रमण करू शकतो असं तैवानचे संरक्षण मंत्री चिऊ कुओ-चेंग यांना बुधवारी देशाच्या संसदेत एका सदस्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

चीन तैवान संबंधांमध्ये गेल्या ४० वर्षांमधील सर्वात वाईट स्थिती आहे. ते संरक्षण मंत्री झाल्यापासून नक्कीच “सर्वात गंभीर” आहे. त्यांनी नमूद केले की संवेदनशील तैवान सामुद्रधुनीवर “मिसफायर” होण्याचा अतिरिक्त धोका आहे. चीनकडे तैवानवर पूर्ण कब्जा करण्यासाठी आवश्यक शस्त्र सामग्री असल्यामुळे, २०२५ पर्यंत बीजिंग आक्रमण करू शकेल.

“संरक्षण मंत्री म्हणून या प्रकरणाचे गांभीर्य माझ्या समोर आहे.” न्यूज एजन्सी रॉयटर्सने तैवानचे संरक्षणमंत्र्यांच्या हवाल्याने म्हटले आहे. “२०२५ पर्यंत चीन या युद्धाची झळ स्वतःला कमीतकमी भासेल याचा बंदोबस्त करेल. पण इतर अनेक गोष्टी विचारात घेता युद्ध सहज सुरू होणार नाही.”

संरक्षण मंत्री चिउ कुओ-चेंग तैवानच्या संसदीय समितीला उत्तर देत होते, ज्यामध्ये क्षेपणास्त्र आणि युद्धनौका तैवानमध्ये बनवण्यासाठी $८.६ अब्जच्या विशेष लष्करी खर्चाचा आढावा घेण्यात आला आहे.

पुढील पाच वर्षात तैवानचा विशेष लष्करी खर्च मुख्यतः नौदलाच्या शस्त्रास्त्रांकडे जाईल ज्यात जहाजावरील क्षेपणास्त्र प्रणाल्यांसह जहाजविरोधी शस्त्रे असतील. गेल्या अनेक दिवसांपासून चीनने केलेल्या प्रगतीमुळे तैवान विशेषतः चिंतेत आहे. कारण चीनी सैन्य विमानांची विक्रमी संख्या तैवानच्या हवाई क्षेत्रावरून वारंवार उडत आहे.

हे ही वाचा:

अमेरिकेकडे किती अण्वस्त्र?

एलआयसी आयपीओमध्ये २०% एफडीआयला संमती?

हिटमॅनचा आणखीन एक सुपरहिट रेकॉर्ड! ठरला पहिलाच भारतीय

बसच्या लोकेशनची यंत्रणा तर बसविली, पण अ‍ॅप सुरूच नाही!

गेल्या शुक्रवारपासून सुरू झालेल्या चार दिवसांच्या कालावधीत तैवानने सुमारे १५० चीनी हवाई दलाच्या विमानांनी त्याच्या हवाई संरक्षण क्षेत्रात प्रवेश केल्याची नोंद केली आहे. जे चीनकडून तैपेईला सतत त्रास होत असल्याचे प्रतिक आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा