30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरदेश दुनिया'शीख हत्यांकाडास जबाबदार असणाऱ्यांची सहानुभूती नको!'

‘शीख हत्यांकाडास जबाबदार असणाऱ्यांची सहानुभूती नको!’

Google News Follow

Related

राहुल गांधींच्या उत्तर प्रदेश दौऱ्याला विरोध करणारे पोस्टर्स लागले

लखीमपूर, उत्तर प्रदेश येथे शेतकऱ्यांचा चिरडून झालेल्या मृत्युचे राजकारण करण्यासाठी लखनऊला आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात तिथे जोरदार पोस्टरबाजी झाली आहे. तुमची सहानुभूती आम्हाला नको, तुमचे हात रक्ताने माखलेले आहे, तुमची साथ आम्हाला नको, १९८४च्या शीख हत्याकांडासाठी जबाबदार असलेले आज शिखांच्या जखमांवर मीठ चोळत आहेत, त्यांची सहानुभूती आम्हाला नको, अशी वाक्ये लिहिलेले पोस्टर्स तिथे झळकत आहेत. त्यातून राहुल गांधी यांच्या या उत्तर प्रदेश दौऱ्याला लक्ष्य केले जात आहे.

आणखी एका पोस्टरमध्ये राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना थेट लक्ष्य करण्यात आले आहे. राहुल गांधी परत जा, प्रियांका गांधी परत जा, शिखांची हत्या करणाऱ्यांनी परत जा असे या पोस्टरवर लिहिले आहे. दुसऱ्या पोस्टरवर म्हटले आहे की, १९८४च्या शीख हत्याकांडाला जबाबदार असलेल्यांची साथ आम्हाला नको. आम्ही न्यायासाठी संघर्ष करत आहोत. दंगेखोरांचे सहाय्य आम्हाला नको.

लखीमपूर हा शीखबहुल भाग आहे. उत्तर प्रदेशातील मिनी पंजाब म्हणून त्याला ओळखले जाते. खलिस्तानच्या आंदोलनादरम्यान दहशतवादी या भागाचा आसरा लपण्यासाठी घेत असत. बब्बर खालसा इंटरनॅशनल ही खलिस्तानी चळवळीशी संबंधित संघटना इथे कार्यरत आहे. लखीमपूर हा उत्तर प्रदेशातील सर्वात मोठा जिल्हा मानला जातो.फाळणीनंतर अनेक शीख कुटुंबे याठिकाणी स्थायिक झाली.

हे ही वाचा:

अमेरिकेकडे किती अण्वस्त्र?

कचरावेचक झाले गायब आणि कचरा दिसू लागला

बॅगच्या पटट्याने केली एसटी चालकाने आत्महत्या

एलआयसी आयपीओमध्ये २०% एफडीआयला संमती?

 

चार शेतकरी चिरडल्याच्या घटनेत एका शीख आंदोलकाच्या टीशर्टवर खलिस्तानवादी भिंद्रनवाले यांचे चित्र दिसले होते. तसेच त्यावर खलिस्तानी चळवळीला समर्थन देणारी घोषणाही टीशर्टवर दिसत होती.

शेतकरी आंदोलनातही मोठ्या संख्येने शीख सहभागी झाले आहेत. त्यामुळे या घटनेला एक वेगळी पार्श्वभूमीही असल्याचे म्हटले जात आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा